खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत व्यसन मुक्ती, अंधश्रद्धेवर आधारित भव्य सम्मेलन थाटात संपन्न


भंडारा, दिनांक : १३ नोहेंबर २०२२ : कारधा येथे रुद्र अवतार भगवान बाबा हनुमान सेवक बहुउद्देशीय संस्था व्दारा आयोजित व्यसन मुक्ती व अंधश्रद्धेवर आधारित भव्य सेवक सम्मेलन व चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती व मुख्य अतिथी खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत सेवक संमेलन व चर्चासत्र संपन्न झाले. या प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संबोधित करतांना खासदार प्रफुल पटेल म्हणाले कि, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्त समाज तसेच आदर्श मानव घडून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे परम पूज्य महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दुःखी, व्यसनाधीन व गरीब माणसाला एका भगवंताचा परिचय करून देऊन निष्काम कार्य करणारे, सत्याचे पुजारी मानव धर्माची व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली. परमात्मा एक सेवक मंडळात अनेक जाती धर्माचे लोक असून त्यांनी आपली जुनी संस्कृती सोडून मानव धर्माची नवीन संस्कृती निर्माण केली.

आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची विशेष ओळख निर्माण व्हावी म्हणून तत्कालीन उपराष्ट्रपती मा. हामीद अन्सारी यांच्या हस्ते २०१३ ला विशेष डाक तिकीट प्रकाशित केली. या महामानवाचे विचार व कार्य दुःखी, व्यसनाधीन व गरीब सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावेत. असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले.

खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, मधुकर कुकडे, नाना पंचबुद्धे, राजूभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, रत्नमाला चेटुले, सरिता मेदनकर, यशवंत सोनकुसरे, नरेंद्र झंझाड, डॉ जगदीश निंबार्ते, आरजू मेश्राम, हितेश सेलोकर, रितेश वासनिक, गंगाधर डोंगरे, रजनीश बन्सोड, रुपेश खवास, विनोद बांते, स्वातिताई मेश्राम, कीर्ती गणवीर, गिरिधर बरगे, घनश्याम मानकर, पांडुरंग बेदेवार, इस्तरी तळेकर, महेश खराबे, गिताताई देवगड़े, शालूताई शिंदिमेश्राम, अरुण वाडीभस्मे सहित परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक, सेविका गण शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment