महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध!


गोंदिया, दिनांक : १० नोहेंबर २०२२ :  तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करीत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा असे निवेदन मा. मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस ने जिल्हाधिकारी व तहसिलदार गोंदिया यांच्या मार्फत निवेदन देऊन अब्दुल सत्तार याचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

अब्दुल सत्तार यांनी खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे. खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावर केलेले आक्षेपार्ह विधान हे समस्त महिलांचा अपमान असुन राज्यातील एका जबाबदार मंत्र्याने केलेली शिवीगाळ ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रसंगी राजलक्ष्मी तुरकर, आशा पाटील, पूजा सेठ, रजनी गौतम, अश्विनी पटले, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, पुष्पलता माने, रुपाली रोडकर, सुदर्शना वर्मा, सोनल मेश्राम सहीत महिला पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Comment