खड्डेमय मार्गामुळे थ्रेसर मशीन चे चाक मुख्य मार्गावर तुटले


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : 09 नोहेंबर 2022 : तालुक्यातील ग्राम पांढरी ते घोटी मार्गावर काल एक धान काढणारी थेरेशर मशीन चे चाक तुटले त्या मुळे मशीन मुख्य मार्गावर तिरक्या स्वरुपात उभी आहे. अश्यात या मार्गाने जाणाऱ्या वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे ही मशीन मुख्य मार्गावर तिरक्या स्वरुपात अपघात ग्रस्थ अवस्थेत आहे. अश्यात मुख्य मार्गाने वाहतूक करणे कठीण झाले आहे. या मसिंचे चाक बॉडी पासून वेगळे झाले आहे. यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी वाहन धारकाचे मोठे नुकसान झाले आहे.

ही नुकसान खड्डेमय रस्त्या मुळे झाल्याचे सांगितलं जात आहे. त्या मुळे विकास कामासाठी होणारा खर्च खरच सामान्य माणसाला परवडणारा आहे. का असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जिल्हात सध्या धान काढणीला सुरवात झाली आहे. त्या मुळे या मशीन मोठ्या प्रमाणावर तालुक्यात आणि जिल्ह्यात पाहण्यासाठी मिळतात.


 

Leave a Comment