अवैध उत्खनन साहेब तुमच्या आशीर्वादाने तर चालु नाही ना?


  • तालुक्यातील अवैध उत्खणानावर नियंत्रण करा : बबलू मारवाडे यांची चर्चेतून मागणी. 

सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक: 26 ऑक्टोंबर 2022 : महाराष्ट्र केसरी न्युज आणि रूद्र सागर न्युज पेपर चे संपादक बबलु मारवाडे यांनी 20 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याचे खनिज विभागाचे अधिकारी सचिन वाढवे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली दरम्यान तालुक्यात चालू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनना बाबद चर्चा केली.

सडक अर्जुनी तालुक्यातून चालत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनानावर नियंत्रण करावे अन्यथा भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे मारवाडे बोलत होते. तालुक्यातील वाळू घाट सध्या बंद असले तरी वाळू आणि मुरमाचा सर्रास पणे उत्खनन केले जात आहे. त्यातच भर दिवसा वाहनाने वाळूची वीणा परवाना वाहतूक केली जात आहे. प्रशासनाकडे सर्व यंत्रणा असून सुधा कर्यवाई सून्य आहे. यात प्रशासनाची मुक संमती असल्याचे समजते. अवैध वाळू वाहतुकीतुन गाव मार्गाची दयनीय अवस्था झाली असून शासनाला रोज लाखोंचा चुना देखील लागत आहे.

त्या मुळे या सर्व प्रकाराला प्रशासनाने गंभीर रित्या घ्यावे असे मारवाडे चर्चे दरम्यान बोलत होते. यावर जिल्हा खनिज अधिकारी यांनी सांगितले की आम्ही स्थानिक प्रशासनाला या बाबद सांगत असतो. मात्र अवैध उत्खनन करणारी मंडळी कारवाई पूर्वीच पळून जातात. यावर उपाय योजना चालू आहे. 2022 – 2023 करीता नव्याने वाळू घटांचे आम्ही सर्वे केला आहे. जिल्ह्यातील 65 वाळू घाटान पेकी 33 वाळू घाट लिलावात सहभागी होणार आहेत. त्यातून नागरिकांना कमी दरात वाळू उपलब्ध होईल आणि चोरीचे प्रमाण कमी होईल असे वाढवे म्हणाले.

मात्र प्रतेक्षात लिलाव झालेल्या जागेतून वाळू किंवा मुर्माचे उत्खनन राज रोष पने एकाच रॉयल्टी वर दिवस भर वाहनाने केला जाते. लिलाव घाटांवर कुठेही सिसी टीवी लावल्याचे दिसत नाही. तर वाहनाचे लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग डीवाईस असून सुधा कुठलीही कारवाई केली जात नाही. रॉयल्टी गडचिरोलीची काढून वाहतूक एक किमी अंतरावर केली जाते.

एकंदरीत प्रशासनाला चकमा देण्याचे काम उत्खनन धारकानकडून केला जातोय. द्रोण द्वारे जिल्हा प्रशासन अवैध उत्खणांवर लक्ष देणार होते आणि कारवाई करणार होते. असे वृत्त पात्रांच्या माध्यमातून वाचण्यास मिळाले. मात्र प्रत्येक्षात तसे नसून जिल्हा खनिज विभागाचा कारभार फक्त कागदावर चालत असल्याचे चित्र दिसत आहे. असे मारवाडे बोलत होते. यावर नक्कीच प्रशासन लक्ष देणार असल्याची ग्वाही वाढावे यांनी दिली.


 

Leave a Comment