नदीतल्या वाळूची डम्पींग थेट वीट निर्मितीच्या कारखान्यावर, कार्यवाई करणार तरी कोण ?


  • तालुक्यातील अवैध रेती उत्खनन बाबद पालक मंत्री सुधीर मुन्गटीवार यांच्याकडे तक्रार !!  

सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दिनांक : १५ ऑक्टोंबर २०२२ : तालुक्यात २०२१ – २०२२ करिता चार ते पाच वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत. अश्यात या वाळू घाटांची अंतिम तारिक सप्टेंबर अखेर ला संपली. अश्यात घाटांच्या बाहेर डम्पिंग केलेली वाळू वाहतुकीसाठी पुन्हा परवाना लागणार अश्ल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ चे काम चालू अशलेल्या अग्रवाल ग्लोबल इन्फ्रोटेक या कंपनीने हे घाट लिलावात घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र नदी पात्रा शेजारी अश्लेल्या वाळूच्या साठ्यावरील वाळू वाहतूक करण्याचा परवाना सध्यातरी उपलब्ध नाही.

असे असले तरी या ठिकाणावरून वाळूची मोठ्या प्रमाणात उचल करून चोरी केली जात आहे. यावर भंडारा पोलिसांना माहिती मिळताच सौन्दड पिपरी च्या वाळू घाटावर मोठी कार्यवाई केली. यात तब्बल १  कोटी ६२ लाखाचा मुदेमाल जप्त करण्यात आला. तर अवैध रित्या वाळू चोरी प्रकरणी कंपनीचे कर्मचारी सह ७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. असे अशले तरी नदी पात्राच्या जवळ अश्लेले वाळूचे ढीग अंदाजे एक किमी लांब उचलून लावण्याचे काम नुकतेच चालू होते.

ही वाळू सौन्दड ते पिपरी मार्गावरील बापू भेंडारकर यांच्या सिमेंट विटा निर्मिती करणाऱ्या कंपनी च्या ठिकाणी लावण्याचे काम जोमात चालू आहे. विशेष म्हणजे प्रतेक्षात वाळू चे ढीग ठेवन्यासाठी दिलेली जागा ती नाही. त्यातच या ठिकाणी ठेवण्यात आलेली वाळू नदीपात्रातील अश्ल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. तर काही शेतकऱ्यांनी देखील सांगितली आहे. म्हणजे डम्पिंग वरील वाळू दुसरीकडे डम्पिंग करणे आहे. मात्र ती प्रतेक्षात डम्पिंग वरील नसून नदी पात्रातिलच वाळू अश्ल्याचे सांगितले जात आहे.

यावर तालुका महसूल विभाग काय कार्यवाई करणार या कडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. याबाबद जिल्ह्याचे माजी पालक मंत्री राजकुमार बडोले यांना देखील माहिती देण्यात आली आहे. त्यांनी अधिकार्यांचा या बाबद समाचार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अध्याप कुठलीही कार्यवाई करण्यात आली नाही. तर नुकतेच एका ट्रकटर वर महसूल विभागाने पहाटे अवैध वाळू वाहतुकी बाबद कार्यवाई केली होती. ही कार्यवाई याच ठिकाणी करण्यात आली होती. सदर वाहन राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याचा होता.

जिल्हा दौर्या दरम्यान तालुक्यातील अवैध रेती उत्खनन बाबद पालक मंत्री सुधीर मुन्गटीवार यांच्याकडे देखील तक्रार ! करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप च्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या वाद विवाद चालू आहे. यावर अधिक माहिती घेण्यासाठी अग्रवाल कंपनीचे अधिकारी पांडे, तालुका तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर, जिल्हा मायनिंग अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यावरून सर्व काही स्पस्ठ होते.


 

 


 

Leave a Comment