सौन्दड; पिपरी रेती घाटावर मोठी कारवाई १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त.


  • देवरी येथील अग्रवाल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पांडे सह साईड मॅनेजर अटक 

सडक अर्जुनी, दिंनाक: १२ ऑक्टोंबर २०२२ : गोंदिया- भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर गौण खनिज तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने, शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे. हा गोरखधंदा गत अनेक महिन्यांपासून सुरू आहे. सदर प्रकार लक्षत घेता, भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे.

अशातच साकोली, सडक/अर्जुनी व देवरी तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण कार्य सुरू असल्याने. रविवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, चारगाव फाटा ते सुंदरी व पाथरी या मार्गावर चुलबंद नदीच्या पिपरी रेती घाटावरून पाच ते सहा टिप्पर जेसीबीच्या सहाय्याने रेती उपसा करून देवरीकडे जाण्याच्या मार्गावर आहेत.

सूचना मिळताच ठाणेदार जितेंद्र बोरकर यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचून नाकाबंदी केली. दरम्यान तिथे एका जेसीबी मशीनसह, तीन टिप्पर रेतीने भरलेले मिळाले, व एक टिप्पर रिकामा मिळाला. तपासणीत रात्रीच्या वेळेस अवैधरीत्या गौण खनिज रेतीचे उत्खनन विना रॉयल्टीने करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत एकुण १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन.

अग्रवाल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पांडे व साईड मॅनेजर वरुण या दोन आरोपींसह टिप्पर चालक आरोपी महेश इशाक शेंडे रा. निलागोंदी, नीलेश हरी खंडाते रा. नवेगाव, मनोजकुमार पुरण पासवान रा. बारीगाव झारखंड, अजय उखमा यादव रा. खोंबीकला झारखंड, इम्तियाज नबी रसूल अन्सारी रा.दलेली झारखंड आदी आरोपींना पोलिसांनी अटक केली, साकोली पो.स्टे. येथे आरोपिंरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन, ०८ ऑक्टोंबर च्या रात्रीला ही कारवाई करण्यात आली अश्ल्याची माहिती साकोली पोलिश स्टेशन चे ठाणेदार जितेंद्र बोरकर यांनी  दिली. सडक अर्जुनी तालुक्यातील पिपरी रेती घाट हे जिल्ह्यात वाळू चोरी साठी प्रशिद्द आहे.

याच ठिकाणी २०२० – २१ मध्ये अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पोलिसांनी कार्यवाई केली होती. त्यात तब्बल १५ वाहना सह जेसीबी सह अन्य साहित्य ताब्यात घेण्यात आली होती. विशेष म्हणजे भंडारा पोलिसांनी ही कार्यवाई गोंदिया जिल्ह्यात शिरून केली आहे. त्या मुळे गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभागावर प्रशन चिन्ह निर्माण झाले आहे.  ( टीम : महाराष्ट्र केसरी न्यूज )


 

Leave a Comment