विधार्थी शाळेत आणि शिक्षक घरी काढतोय झोपा! तालुका शिक्षण विभागाचा अजब कारभार!


सडक/अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे )  दिनांक : ११ सप्टेंबर २०२२ : तालुक्यातील ग्राम बिर्री/ शिन्दिपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक उपस्थित नश्ल्याने विधार्त्यांची तारांबळ उडाली. ग्राम बिर्री येथे वर्ग १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. एकूण २४ विधार्थी आहेत. ही घटना शनिवार १० सप्टेंबर २०२२ रोजीची आहे. या ठिकाणी वाडीभस्मे नामक शिक्षक कार्यरत आहेत. सदर शिक्षक हे नेहमीच आपल्या शाळेला दांडी मारून शाळेत उपस्थित राहत नाही. त्यांची गावकर्यांनी यापूर्वी देखील वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र कुठलीही कार्यावाई करण्यात आली नाही. असे दरम्यान गावकरी सांगत होते.



यावेळी गावातील पालक वर्ग आणि शाळा समितीचे पदाधिकारी शाळेच्या आवारात जमा झाले होते तर तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी सुभाष बागडे, पंचायत समिती चे सदस्य रुखीराम वाढई, जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, सह अन्य पदाधिकार्यांना गावकर्यांनी संपर्क साधला काही कालावधी नंतर पधाधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले.

गावकर्यांनी गट शिक्षण अधिकार्यांना घेराव घालत खडे बोल सुनावले तर अश्या बेशिस्त शिक्षकावर कार्यावाई करावी अशी मागणी दरम्यान गावकर्यांनी केली आहे. सदर शिक्षकाने कुठलीही पूर्व सूचना न देता सुट्टी मारली अश्ल्याने मुलांच्या शिक्षणाचा खोळंबा झाला आहे. गावकर्यांनी विचारणा केली असता दरम्यान अधिकाऱ्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिली. गावकर्यांनी दरम्यान सांगितले की वाडीभस्मे नामक शिक्षक हे भंडारा येथे राहतात. आणि श्रीराम नगर येथे आपण राहत अश्ल्याचे सांगतात. मात्र ते मुख्यालई राहत नाही.

तरी देखील शासनाकडे खोटे कागदपत्र लाऊन महिन्या पोटी घर भाडे भत्ता उचलतात, एकंदरीत शासनाची दिशाभूल शिक्षण विभागाकडून केली जात आहे. त्या मुळे गावात मुख्यालई राहणारा नवीन शिक्षक ध्यावा अशी मागणी केली आहे. जो पर्यंत दुसरा शिक्षक आमच्या शाळेला देणार नाही तो पर्यंत शाळा बंद राहील असे लेखी निवेदनात म्हटले आहे. यावेळी  शाळा समितीचे अध्यक्ष राजकुमार डोंगरवार, रमेश डोंगरवार उपाध्यक्ष, अजित डोंगरवार सदस्य, मिथुन सुतार सदस्य, खुशाल डोंगरवार, वीरेंद्र सुतार सह अन्य नागरिक उपस्थित होते, ज्या अर्थी जिल्ह्यातील ९९ टक्के शिक्षक मुख्यालई राहत नाही तर खोटे कागद पत्र जोडून शासनाच्या तिजोरीवर बोजा कश्या पाई हा तर खरा मुद्दा आहे. आता हे सर्व माहित असताना देखील जिल्हा परिषद गोंदिया काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी सुभाष बागडे: मी इथे आल्यानतर सदर शिक्षक उपस्थित नवते, तर त्यांना फोन करून विचारणा केली असता त्यांची प्रकृती बरी नाही त्या मुळे ते  हजर होऊ शकले नाही त्यांनी असे मला फोनवर सांगितले, तालुक्यात ८० शिक्षक कमी आहेत. तरी देखील या शाळेला मी दुशरा शिक्षक देणार आहे. गावकर्यांच्या मागणी नुसार.

तालुका पंचायत समिती चे सदस्य रुखीराम वाढई : मी नेहमी पंचायत समितीच्या मिटिंग मध्ये हे मुद्दे मांडत असतोय, तालुक्यात एक शिक्षकी शाळा मध्ये असे प्रकार घडतात. त्या मुळे माझ्या भागातील बिर्री, सिंदिपार, पंचवटी, माउली, या शाळेचे मुद्दे असतात. शिक्षकाने पूर्व सूचना देऊन  सुठ्ठी घ्यायला पाहिजे होती. जिल्यातील ९९ टक्के शिक्षक मुख्यालई राहत नाही हे ही खरे आहे.

जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे : जिल्हा परिषद मध्ये जीबी झाली होती. त्या मध्ये जिल्ह्यातील शिक्षण विभागावर आधारित विविध मुद्देघेउन  ३ तास मिटिंग झाली होती, आज या शाळेत शिक्षक उपस्थित नश्ल्याने मुलांच्या शाळेचा खोळंबा झाला अश्ल्याने दोषीवर कार्यवाई झाली पाहिजे.


 

Leave a Comment