बाबो..! ईडीने केलेल्या कारवाईत घरात अक्षरशः पैशांचा ढिग लागला


कोलकाता, वृत्तसेवा 23 जुलै 2022 : पश्चिम बंगालमध्ये सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या एका कारवाईत मोठ्ठं घबाड हाती लागलं आहे. शुक्रवारी (२२ जुलै) केलेल्या या कारवाईत एक दोन नव्हे तर तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीने तब्बल 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

ईडीने केलेल्या या कारवाईनंतर घरात अक्षरशः पैशांचा ढिग लागला आहे. ईडीने 20 कोटींच्या रोख राकमेसह 20 मोबाईल, कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही जप्त केल्या आहेत. शुक्रवारी (२२ जुलै) ईडीने पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत जप्त करण्यात आलेली रोकड स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी संबधित असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

या प्रकरणी तपास करताना ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरीही छापेमारी केली असता ईडीच्या अधिकाऱ्यांना २० कोटींचे घबाड मिळाले. या कारवाईनंतर परिसराच एकच खळबळ उडाली आहे. अर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखलं जातात. स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळा प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला हे प्रकरण सोपवलं होतं. आता याप्रकरणी ईडी सरकारी अधिकारी संबंधित नेत्यांवर कारवाई करु शकतात.

ईडीच्या सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार, एजन्सी छापे टाकत असलेल्या १३ ठिकाणांच्या सुरुवातीच्या यादीत मुखर्जी यांचे निवासस्थान नव्हते. पण छापेमारीत मुखर्जीचे नाव समोर आल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) कर्मचार्‍यांसह ईडीने त्यांच्या निवासस्थानी पोहोचून शोध आणि जप्तीची कारवाई सुरू केली.


 

Leave a Comment