कृषि विभागाच्या वतीने महिला शेतकर्यांना मोफत परसबाग भाजीपाला बियाणे वाटप.


सडक/अर्जुनी, गोंदिया : दिनांक ०७ जुलै 2022 : तालुक्यातील ग्राम बाम्हणी /ख. अंतर्गत येणाऱ्या कृषि सहायक कार्यालय येथे महिला शेतकर्यांना कृषि विभागा मार्फत मोफत परसबाग भाजीपाला बियाणे वाटप. दिनांक 06 जुलै रोजी महिला शेतकर्यांनी 1 गुंठा क्षेत्रावर भाजीपाला लागवड करून कुटुंबासाठी सकस व विषमुक्त आहार उपलब्ध होईल या उद्देश ठेऊन महिला शेतकर्यांना मोफत परसबाग भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

प्रामुख्याने कुपोषित बालक असलेले कुटुंब, गरोदर माता, आर्थिक दुर्बल शेतकरी, आत्मा नोंदणीकृत महिला शेतकरी गट, महिला शेतीशाळा राबवणाऱ्या महिला असे शेतकरी निवडीचे निकष ठेऊन राजशेखर राणे कृषि सहाय्यक यांनी महिला शेतकर्याची निवड करून घेतली. भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, वाल, मेथी, गाजर, गवार, मिरची, कोथिंबीर असे एकूण 180 ग्राम महाबीज बियाणे कीट वाटप करण्यात आली. शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्याबाबत राजशेखर राणे कृषि सहाय्यक यांनी मार्गदर्शन व परसबाग नकाशे उपलब्ध करून दिले.

या कामगिरी सठी सर्व लाभार्थी महिला व बाम्हणी गावच्या सरपंच प्रतिमा ताई कोरे यांनी राजशेखर राणे कृषि सहाय्यक यांचे आभार मानले. या प्रसंगी म.रा. ग्रा. जीवनज्योती अभियानाच्या कृषि सखी ललिता ताई चुटे, गट प्रमुख शितल लोकेश तरोने, सुमन विश्वनाथ रहेले वंदना योगेश्वर डोये, रेखा रवींद्र शिवणकर, पुष्पा हिरालाल गजभिये, ललिता उद्धव भेंडारकर, मीना नरेश कोरे, हिर्काना जागेश्वर वाढई, छाया होमराज पात्रे मंजुषा आत्माराम शिवणकर, संगीता हेमंत तरोने, नंदा किशोर कोरे, विमल हिरामण शिवणकर, नीता देवेंद्र बडोले, छाया हेमकृष्ण लंजे गट प्रमुख दीपिका किशोर तरोने, माया नवीन ह्त्तीमारे, ममता शंकर चुटे, प्रीती जितेंद्र चुटे, सुनिता गंगाधर वाढई, अरुणा कैलास कोडापे ,ललिता जीवन चुटे, संध्या सुरेश कोरे, कुसुम पुरुषोत्तम पातोडे, ज्योती टेकचंद चुटे, पोर्णिमा सुजित हत्तीमारे, सुमन मोहन तवाडे मंजू अरविंद चुटे, तरासान भीमराव रामटेके, सह  महिला शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.


 

Leave a Comment