कारागृहातील 540 महिला व पुरुष कैद्यांची तपासणी.


  • चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्रामतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिर

चंद्रपूर, दिं. 14 मे 2022 :  जिल्हा कारागृह, येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूरतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिराचे आयोजन करून
कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिरामध्ये कारागृहातील 540 महिला व पुरुष कैद्यांची तपासणी करण्यात आली.

आरोग्य शिबिरात टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर्स, परिचारिका, दंतचिकित्सक यांच्यामार्फत कैद्यांची तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदाब, मधुमेह, मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाची तपासणी करण्यात आली.

यावेळी सदर शिबिरात उपस्थित महिला व पुरुष कैद्यांना मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले व सर्वांनी तपासणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.

कर्करोगाची लक्षणे तसेच कर्करोग आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, या महत्त्वाच्या बाबींवर डॉ.वैदेही लोंखडे व डॉ. अदिती निमसरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले व उपचाराविषयी माहिती देण्यात आली.


 

Leave a Comment