परसोडी गावातून चुलबंद नदीच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा जोमात.


संग्रहित छायाचित्र


  • गावाच्या मुख्य मार्गावर सीसीटिव्ही लावल्यास सत्य येईल समोर.
  • साकोली तालुक्यातील परसोडी, गोंडउमरी, सोनका पळसगाव, महालगाव चुलबंद नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा.

भंडारा, गोंदिया, विशेष प्रतिनिधी, दी. 06 : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चुलबंद नदीच्या पात्रातून दिवसा ढवळ्या अवैध वाळूचा उपसा जोमात चालू आहे, यावर स्थानिक प्रशासन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याचे शेतकरी सांगतात, दिवसा ढवळ्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या कथित ठेकेदारावर महसूल प्रशासनाचे अभय असल्याचे बोलले जाते, साकोली आणि सडक अर्जुनी तालुक्याला लागून असलेल्या चुलबंद नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे, सध्या वाळू घाट बंद असल्याने वाळू चोरांची चांदी झाली असून अधिकाऱ्यांना चिरी मिरी देऊन हप्ते बांधले जातात यात काही कुणी नवल मानून घेऊ नये?

त्या मुळे शासनाची रोज कोट्यावधी रुपयांची नुकसान होत आहे, या पूर्वी देखील वाळूचे स्टॉक च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध लूट करण्यात आली आहे, गावकऱ्यांच्या तक्रारीवरून महसूल विभागाने वाळू जप्तीची कारवाई परसोडी गावत केली, यात अंदाजे 70 ते 100 ब्रास वाळू जप्त केली होती, परसोडी गावाच्या दोन्ही बंद वाळू घाटातून वाळूची अमाप चोरी रोज केली जाते, यावर नियंत्रण करण्यासाठी गावाच्या मुख्य मार्गावर सीसी टीवी लावल्यास सर्व समोर येईल.

मात्र महसूल विभागाचे अभय असल्याने पाहून आंधळे होणारे प्रकार असल्याचे सांगितले जाते, सध्या वाळूघाट उपस्या साठी दीले नसल्याची माहिती समोर येत आहे, अवैध वाळू उपशया मुळे गाव मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे, दररोज शासनाला कोट्यावधी रुपयांचा चुना लाऊन कथित वाळूचोर बोके झाल्याची चर्चा आहे, काही वाळू वाहतूक करणारे, अधिकारी आणि कर्मचारी आपण खिश्यात ठेवतोय असे बोलून प्रशासकिय यंत्रणेची टिंगल टवाळी करतात, याला जबाबदार कोण असे जनतेतून विचारणा केली जात आहे.

साकोली तालुक्यातील परसोडी, गोंडउमरी, सोनका पळसगाव, महालगाव चुलबंद नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करून, ही वाळू 2 ब्रास च्या ट्रॅक मध्ये भरून बाहेर गावी मोठ्या किमतीने विक्रीसाठी पाठविली जाते, यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या सुरवातीला तालुका महसूल विभागाने धडक कारवाई करून अनेक  वाहन पकडले मात्र मार्च इंड झाल्याने अधिकारी कर्मचारी सुस्थ झाल्याचे बोलले जाते, भाजप चे आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक प्रकरण बाबद् प्रकरण विधान भवनात मांडला होता मात्र समोर काय झाले त्यावर अद्याप स्पस्ठ नाही.


तलाठी परसोडी, श्री. शेकर ठाकरे, साकोली तालुका : मी दोन दिवसा पूर्वी तीन ट्रॅक्टर वर अवैध वाळू वाहतूक प्रकरणी कारवाई केली आहे, यात स्वप्नील भाजीपाले, संतोष चांदेवार आणि संतोष परसुरामकर अशी वाहन धारकांची नावे आहेत, अजून वाळू घाट लिलाव प्रक्रिया झाली नाही, अवैध वाहतूक करणाऱ्यावर आमची कारवाई सुरू आहे.


 

Leave a Comment