महिलांनो कॅन्सर स्क्रिनिंग करा : जिलाधीश नैना गुंडे


गोंदिया, दि. १५ मार्च : जागतिक महिला दिन निमित्त के. टी. एस. जिल्हा रुग्णलयाच्या प्रांगणात भव्य. कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते, या कॅम्प चे उदघाटन गोंदियाच्या जिल्हाधिकारी मा. नैना गुंडे यांच्या शुभ हस्ते, धन्वंतरी पूजन करून करण्यात आले, या वेळी मेडिकल कॉलेज चे अधिष्टता डॉ अपूर्व पावडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे प्रसूती विभाग प्रमुख डॉ पाटील

डॉ. सागर सोनारे आणि कॅन्सर जनजागृति प्रमुख डॉ. सुवर्णा हुबेकर व एन सी डी समनव्ययक स्नेहा वंजारी , डॉ. सुरेखा आझाद बोरकर व नगरसेविका भावना कदम बाजपाई ड्राइविंग स्कूल च्या संचालिका लता बाजपाई आधार महिला संघटन च्या सीमा डोये व सविता बेदरकर
माधुरी लाड शुक्ला सिस्टर्स आदि प्रामुख्याने उपस्थित होत्या या शिबिरात मार्गदर्शन करताना मा जिल्हाधीकारी डॉ. नयना गुंडे म्हणाल्या
आज काल महिला मध्ये कॅन्सर चे प्रमाण खुप वाढले आहे.

प्रतिबंध हाच एक उपाय आहे, त्यामुळे चाळीशी तील महिलांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व कॅन्सर स्क्रिनिंग करून घ्यावी. जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. अंबरीश मोहबे यांनी सांगितले की महिला या कुटुंबाच्या केंद्र बिंदू असून ही स्वतः च्या आरोग्याची हेळसांड करतात म्हणून आता प्रत्येक सरकारी ग्रामीण हॉस्पिटल मध्ये ब्लॉक लेवल ला देखील असे मोफत कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन केले आहे.

त्याचा लाभ घ्या! प्रसूती व स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ राजेश्री पाटील यांनी सांगितले की बी जी डब्लू च्या ओ पी डी मध्ये प्याप्स समेयेर तपासनी मोफत उपलब्ध आहे , स्तन कॅन्सर व गर्भाशय कॅन्सर बाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली व जागतिक महिला दिनाच्या पर्वा वर स्वतः ची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात स्तन कॅन्सर प्रतिबंध बाबत आरोग्य प्रदर्शनी व सेल्फी स्टँड लावले होते ते महिलांच्या आकर्षणाचा बिंदू ठरले होते डॉ सुरेखा आझाद बोरकर यांच्या नेतृत्वात पिंक रिब्बन क्लब ची स्थापना करण्यात आली या वेळी स्वाती बनसोड अर्चना वासनिक पल्लवी राऊत रुपाली टोने स्वाती बावनकार आदीनि कॅम्प यशस्वी करण्यासाठी मदत केली.


 

Leave a Comment