सौंदड; गावाच्या मुख्य मार्गावर अतिक्रमण, देशी दारूचे ट्रॅक नियमित उभे.


  • गेली अनेक वेळा बातम्यांचा पाठपुरावा करून देखील प्रशासन मूंग गिळून गप्प, ग्राम पंचायत मासिक सभेत ठराव मंजूर का नाही, मासिक हप्त्याची घेवाण देवाण तर होत नाही ना, महाराष्ट्र केसरी न्युज चा आरोप, वयक्तिक संबंध जोपासण्याचा ग्रा.प. चा प्रयत्न.  

सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : ०३ मार्च : तालुक्यातील ग्राम पंचायत सौंदड अंतर्गत येत असलेल्या बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड क्रमांक : ५ च्या मुख्य मार्गावर गेली अनेक वर्षे पासून गावातील देशी दारू च्या गोडाऊन मालकाने ताबा केला असून सातत्याने आपली २, ३, वाहने उभी केली जाते, त्या मुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी निर्माण होते, ग्राम पंचायत सौंदड चे पदाधिकारी यांना ही बाब माहित असून देखील यावर अद्याप कोणतीही कारवाई केली जात नाही.

एकंदरीत आपले संबंध सुरळीत सुरू राहावे याची काळजी घेतली जात आहे, लोक चर्चा आहे की या गोडाऊन धारका कडून संबंधित यंत्रणेने ला मासिक हप्ता मिळत असावा त्या मुळे यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, या ठिकाणी रेल्वे गेट आहे, गेट बंद झाल्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने उभी असतात, गेट उघळल्या नंतर सर्व वाहने जाण्यासाठी धळपल करतात, अश्यात मुख्य मार्गावर उभे वाहन अपघाताला आमंत्रण देत आहे.

ग्राम पांढरी येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती येथे झाल्यावर प्रशासन आणि गोडाऊन मालक जागे होणार का ? असे बोलले जाते, गेली अनेक वर्षे पासून सातत्याने पाठपुरावा केला जात असून देखील सुद्धा प्रशासन मुंग गिळून गप्प का आहे, त्या मुळे या दोघात साटे लोटे असल्याचे समजते, सौंदड ते राका, नवेगाबांध, चिखली, पलसगाव असा हा मार्ग चोवीस तास चालते, अवजड वाहने या मार्गाने भरधाव वेगात चालतात, त्यातच अरुंद मार्ग असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही, या ठिकाणी अपघात झाल्यास याला जबाबदार कोण राहील असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

गेली अनेक वेळा बातम्यांचा पाठपुरावा करून देखील प्रशासन मूंग गिळून गप्प का आहे ? , तर हा अतिक्रमण काढण्यासाठी ग्राम पंचायत ने मासिक सभेत ठराव मंजूर का केला नाही, मासिक हप्त्याची घेवाण देवाण तर होत नाही ना असा आरोप महाराष्ट्र केसरी न्युज ने केला आहे, वयक्तिक संबंध जोपासण्याचा ग्रा.प. चा प्रयत्न दिसत आहे, हा अतिक्रमण काढण्याची मागनी होत आहे.


 

Leave a Comment