शिवजयंती निमित्त एकोडी ग्राम पंचायत तर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या : अश्विनी पटले यांचा सत्कार


गोंदिया, दी. २४ : एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रान्तर्गत येणाऱ्या एकोडी ग्राम पंचायत येथे शिवजयंती निमित्ताने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले यांचा सत्कार ग्राम पंचायत कार्यालय येथे सरपंचा शालु मुन्ना चौधरी यांच्या अध्यक्षते खाली ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.

सरपंचा शालु मुन्ना चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ह्या प्रसंगी अश्विनी पटले म्हणाल्या कि एकोडी सह जिल्हा परिषद क्षेत्रात ज्या ज्या समस्या आहेत. त्या सर्वाचे प्रश्न लवकरच मार्गी लावु, मग ते आरोग्य विषयी असो किंवा शिक्षण, रोड रस्ते असो आपण माझ्यावर विश्वास दाखवत मला निवडुन दिले त्या बद्दल मी आपण सर्वांची आभारी आहे.

जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत किंवा कामे करायची आहेत त्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत ठाम पणे उभी आहे तसेच आपण सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी गंगाझरी पंचायत समिति सदस्या वंदना प्रकाश पटले, उपसरपंच वर्षा अंबुले, ग्राम पंचायत सदस्य राकेश बिसेन, पुरषोत्तम भदाडे, वहीदा शेख, शबनम पठाण, वैशाली बिसेन, शुभम बोदेले, जगजीवन वघारे, माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश पटले, माजी सरपंच अशोक रिणायत, माजी सरपंच रविकुमार (बंटी) पटले , माजी उपसरपंच किरणकुमार मेश्राम, पोलिस पाटील दिलीप रिणायत, के.टी.बिसेन, भावलाल पटले, मुन्ना चौधरी, खोमेश तुरकर, ढेकलाल पारधी, राजेश पाटील, बिरनवार गुरुजी, पांडुरंग रहांगडाले, मुन्ना गौतम, मोतीलाल उके व गावातील नागरिक उपस्थित होते.


 

Leave a Comment