अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नागपूर विभाग प्रसिद्धिप्रमुख पदी पत्रकार साहिल रामटेके यांची नियुक्ती


भंडारा, साकोली, दी. २४ : साकोली तालुक्यातील शिवणीबांध येथील रहिवाशी न्युज १५ मराठी चे तालुका प्रतिनिधी पत्रकार साहिल रवींद्र रामटेके यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नागपूर विभागीय प्रसिद्धीप्रमुख पदावर लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्रकार साहिल रामटेके यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर आणि सरचिटणीस जयेंद्र चव्हाण यांनी लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केली आहे.

पत्रकार साहिल रामटेके यांची परिषदेच्या नागपूर विभागीय प्रसिद्धिप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,  विदर्भ अध्यक्ष आनंदकुमार शेंडे, सचिव प्रा.मिलिंद रंगारी,उपाध्यक्ष कवी सुभाष मानवटकर नागपूर विभाग अध्यक्ष सतीश सोमकुवर, सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, उपाध्यक्षा प्रा.किरण पेठे,बांधकाम संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष धम्मपाल उके,मुंबई हायकोर्टाचे ऍड.निवृत्ती मेश्राम,पत्रकार आकाश नंदागवळी, न्युज १५ मराठी चे संपादक आशिष ढगे पाटील आदींनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.


 

Leave a Comment