पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे संत गाडगेबाबा व संत रविदास महाराज यांची जयंती साजरी


गोंदिया, दी. २३ – सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ति यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोदिया यांच्या शुभ हस्ते दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे संत गाडगेबाबा व संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस उपअधिक्षक (मुख्या) श्री दिनकर ठोसरे, पोनि महादेव तोदले, महेश बन्सोडे, अजय भुसारी, रंगनाथ धारवळे तसेच पोलीस अधिकारी / अमलदार व मंत्रायलयीन स्टाफ उपस्थित होते.


 

Leave a Comment