सड़क अर्जुनी येथे व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्‌घाटन


सडक अर्जुनी, दी. 13 : स्पोर्टिंग क्लब सडक अर्जुनी च्या वतीने शिवमंदीर बसस्थानक परिसरात दिवस व रात्रकालीन तीन दिवसीय व्हॉलीबाल स्पर्धेचे उद्‌घाटन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते ( 11 रोजी ) संपन्न झाले, यावेळी नगरसेवक देवचंद तरोणे, नगरसेवक महेंद्र वजारी , नगरसेवक तेजराम मडावी , आनंदकुमार अग्रवाल , गोपीचंद खेडकर , अश्लेश अंबादे , नगरसेविका दिक्षा भगत , भाजपा जिल्हा सचिव शेषराव गिऱ्हेपुंजे , शिवसेना जिल्हा संघटक राजूभाऊ पटले , तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे , आरोग्य सेविका उषा जगताप, पत्रकार बिरला गणाविर , सामाजिक कार्यकर्ता डॉ. रविंद्र रामटेके , आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी खेळामध्ये सातत्य टिकवून ठेवणे गरजेचे असून या माध्यमातून गुणवत्ता प्राप्त करता येते, त्यामुळे खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडूंनी पोहण्याचा प्रयत्न करावा , प्रगतीचे शिखर कसे गाठता येईल याकडे लक्ष ठेवणे गरजचे असल्याचे आमदार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक अजय गायकी यांनी तर संचालन बंटी संय्याम यांनी केले, आभार बिरला गनवीर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.


 

Leave a Comment