ओमिक्राॅन आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर – आरोग्यमंत्री राजेश टोपे


मुंबई, वृत्तसेवा, दिनांक – 25 डिसेंम्बर 2021 –  राज्यात ओमिक्राॅनचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं चांगलचा कहर केला आहे. जगभरातील ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. ओमिक्राॅन आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर केली. यातच ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.

तिसरी लाट जर येणार असेल तर ती ओमिक्राॅनचीच असेल. असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. आताच जर आपण राज्यात खबरदारी घेतली नाही, तर रुग्णवाढीचा दर आणखी वाढण्याची भीती असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.


 

Leave a Comment