राज्य सरकारला मोठा धक्का! OBC आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


नवी दिल्ली, वृत्तसेवा, दिनांक – 15 डिसेंम्बर 2021 – ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आरक्षण लागू करण्यापूर्वी तिहेरी चाचणी करणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. इम्पेरिकल डेटा देऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत आज (१५ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सकाळी ११ वाजता सुनावणी पार पडली आहे.

केंद्राने महाराष्ट्र सरकारला इम्पेरीकल डाटा पुरवावा किंवा मग राज्य सरकारला डाटा गोळा करण्यासाठी वेळ द्यावा आणि तोपर्यंत सगळ्या निवडणूका पुढे ढकला, अशी मागणी याचिकेत केली आहे. यावर निवडणुकांसंदर्भात काल (१४ डिसेंबर) सुनावणीत युक्तिवाद झाला होता.

ओबीसी जागांवर होणाऱ्या निवडणुका स्थगित.

निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि १०५ नगरपंचायतीच्या समित्यामध्ये होणाऱ्या निवडणुकातील ओबीसी जागांवर होणाऱ्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत. तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेतील ओबीसी जागांना स्थगिती झाल्या आहेत. आता राज्यातील पंचायत समितीच्या ४५ ओबीसी जागांना स्थगित झाल्या आहेत. तर येत्या २१ डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. फेब्रुवारीमध्ये २३ महापालिका, २५ जिल्हा परिषदा, २९९ पंचायत समित्या, २८५ नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास स्थगिती.
राज्यातील स्थानिक निवडणुकीत ओबीसीना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे न्यायालायने तुर्तास तरी ओबीसी आरक्षण स्थगिती दिली आहे. राज्यचा आध्यादेश ग्राह्य धरला येणार नाही, असेही न्यायालयाने नमुद केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय मानला जातो. न्यायालयाने ओबीसीच्या आरक्षणाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली.

( लोकसत्ता वरून )


 

Leave a Comment