विध्यार्थी शाळेत आणि शिक्षक घरी, मुख्यालय राहण्याच्या शासन निर्णयाला खो…


  • कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखले घेऊन मुख्यालयी राहत असल्याचे भासवतात ?

सडक/ अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) गोंदिया, दिनांक 14 डिसेंम्बर 2021 – तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील जिल्हा परिषद प्राथमिक नागरी शाळा क्रमांक – 1 येथील प्रकार, शाळा भरण्याची वेळ 10 : 30 आहे , असे या शाळेच्या एका शिक्षकांनी सांगितले, त्या अगोदर विध्यार्थी शाळेत येतात, त्या पूर्वी शाळेच्या गेट चा ताला उघळणे गरजेचे आहे, मात्र प्राथमिक शाळेला परिचालक नसल्याने शाळा शिक्षकांनाच उघळावी लागते हे विशेष मात्र शिक्षक मुख्यालई न राहता साकोली, लाखनी, सडक अर्जुनी वरून अप डाऊन करीत असल्याचे सांगितले जाते, परिणामी शिक्षक वेळेवर शाळेत पोहचू शकत नाही, त्या मुळे विद्यार्थ्यांना शाळेची गेट उघळण्यासाठी वाट पहावी लागते.

सौन्दड नागरिक शाळेची आवार भिंत पडकी असल्याने तुटलेल्या भिंतीच्या ठिकानातून विध्यार्थी शाळेत प्रवेश करीत असल्याचे चित्र आपण पाहू शकताय, परिणामी यात काही इपरीत घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल देखील पालकांकडून उपस्थित केला जात आहे, मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना कायद्याची जाणीव नसल्याने शिक्षत… शिक्षक त्यांना जुमानत नाही ही परिस्थिती ग्रामीण भागाची आहे, मात्र मुख्यालई न राहता घर भाडे भत्ता, कसा उचलला जाते हा देखील संशोधनाचा विषय आहे. 

गोंदिया जिल्हा नक्षल ग्रस्त असल्याने या जिल्ह्यात काम करणाऱ्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना 15% नक्षल भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, आणि कित्तेक वेळ आपण पाहिलं असेल मुलांच्या खिचडीत देखील भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त, म्हणजेच कुठुन काय घेता येईल ते घेण्याची ईच्या शासकीय कर्मचारी ठेवतात, एवढंच नाही तर कथित शिक्षक आणि मुख्याध्यापक देखील शाळेच्या वेळेत बार मध्ये बसून मध्यप्राशन करतात, एकंदरीत यांच्यावर संबंधित विभागाचे वचक नसल्याने आबे लड्डू… जाबे लाड्डू ची प्रथा सुरू आहे.

  • काय आहे शासन निर्णय…?

जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती दिल्या जाणाऱ्या वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे, ग्रामस्थांना त्यांच्याकडून दिल्या जाणाºया सेवांसाठी मुख्यालयी राहावेच लागते, त्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक, शिक्षकांचा समावेश आहे, मात्र हे सर्व कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखले घेऊन मुख्यालयी राहत असल्याचे भासवतात, प्रत्यक्षात मुख्यालयी न राहताच घरभाडे भत्ता वसूल करतात, ही बाब पंचायत राज समितीच्या २०१७-१८ च्या अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आली. त्यामध्ये ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.

त्यानुसार शासनाने कर्मचाऱ्यांबद्दलच्या धोरणात बदल केला आहे. कर्मचाऱ्यांनी रहिवासी दाखला कोणाकडून घ्यावा, हे ठरवून देण्यात आले. ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला. वित्त विभागाच्या ७ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या निर्णयातील अट विचारात घेऊन बदल करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांनी मुख्यालयी राहत असल्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, मात्र या सर्व प्रकाराला शासकीय कर्मचारी खो देत तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणावरून उप डाऊन करतात, आणि शासनाच्या निधीची अवेध रित्या उचल करतात याला जबाबदार कोण असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

  • सौन्दड जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख, डी. झेड. लांडगे.

शिक्षकांनी मुख्यालई राहणे बंधन कारक आहे, त्यातच वेळेत शाळेत हजर होणे बंधनकारक आहे, ग्रामीण भागातील नागरिक मुलांना शाळेत पाठवून आपण शेतात मजुरी करिता जातात, त्या मुळे शाळेत वेळेवर येणे शिक्षकांची जबाबदारी आहे, काही विपरीत घटना घडल्यास त्याला शिक्षक जबाबदार राहतील, मी शिक्षकांना त्या बाबद बोलतोय, या पुढे असे होऊ नये म्हणून.


 

Leave a Comment