चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक



चंद्रपूर, दिनांक – 20 नोव्हेंबर 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या विदर्भाच्या दौऱ्यातील तिसऱ्या दिवशी 19 ला चंद्रपूर जिल्हात राजीव गांधी कामगार भवन, चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक खा. शरदचंद्र पवार, खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला.

चंद्रपुर हा महत्वाचा जिल्हा आहे, स्वातंत्र लढयात ह्या जिल्हा चे योगदान मोठे आहे. या जिल्हयात दोन घटक महत्वाचे आहेत. एक शेतीचे उत्पादन या भागातील शेतकरी मेहनतीने धानाचे उत्पादन घेतो आणी यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रफुल पटेल यांच्या आग्रहाखातर येथिल शेतकर्‍यांना धानाचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षी पण काही ना काही बोनस राज्य सरकारशी बोलुन देण्याचा प्रयत्न करणार. दुसरा घटक औद्योगिक उत्पादन या भागात देशातील सर्वात जास्त कोयला उत्पादन केले जाते.

राज्याची विजेची गरज हा जिल्हा भागवतो, राज्याच्या विकासाचा पाया तयार करण्याचे काम या जिल्ह्याने केले आहे. आज पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढल्या ह्याचा परिणाम गरीब लोकांच्या छोट्या छोट्या गरजा भागविण्यासाठी अडचणीचे ठरते, गरीबांना याची झळ सोसावी लागते. या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या लोकांना राज्यात प्रतिनिधित्व करता यावे अशी आमची पण इच्छा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुका मध्ये महिलांना ५० टक्के जागा देण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.

त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्या. या वेळी कार्यक्रमात खा. शरदचंद्र पवार , खा.  प्रफुल पटेल यांचा सोबत ना. प्राजक्त तनपुरे, माजी खा.  सुबोध मोहिते पाटील, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खा.  मधुकर कुकडे, आमदार  मनोहर चंद्रिकापुरे, प्रवीणकुंटे पाटील,  राजीव कक्कड,  बाबा साहेब वासाळे, राजेंद्र वैध,  वर्षाताई निकम, मेघा रामगुंडे, शालिनीताई माकुलकर,  चारुशीला बारसागडे,  अश्विनीताई तालापल्लीवार,  सुरेश रामगुंडे,  शशिकांत देशकर,  नितीन जी, हरिश्चंद बोरकुटे,  असिकरजी व चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते .


 

Leave a Comment