राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव शेतकरी, शेतमजूर व महिलांच्या पाठीशी – शरद पवार


चंद्रपूर, दिनांक 18 नोव्हेंबर 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या विदर्भाच्या दौऱ्यातील दुसर्‍या दिवशी तालुका क्रिडा संकुल, मूल जि.चंद्रपुर येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा खा. शरदचंद्र पवार व खा. प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी संबोधित करताना शरदचंद्र पवार  म्हणाले की, चंद्रपुर हा महत्वाचा जिल्हा आहे, स्वातंत्र लढयात ह्या जिल्हा चे योगदान मोठे आहे. या जिल्हयात दोन घटक महत्वाचे आहेत. एक शेतीचे उत्पादन या भागातील शेतकरी मेहनतीने धानाचे उत्पादन घेतो आणी यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रफुल पटेल यांच्या आग्रहाखातर येथिल शेतकर्‍यांना धानाचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षी पण काही ना काही बोनस राज्य सरकारशी बोलुन देण्याचा प्रयत्न करणार. दुसरा घटक औद्योगिक उत्पादन या भागात देशातील सर्वात जास्त कोयला उत्पादन केले जाते.

राज्याची विजेची गरज हा जिल्हा भागवतो, राज्याच्या विकासाचा पाया तयार करण्याचे काम या जिल्ह्याने केले आहे. देशात आज वेगळ्या विचारसरणीचा पक्ष सत्तेत आहे. जात, धर्माचे तेढ निर्माण करण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्रिपुरा येथे झालेल्या दंगलीचे परिमाण अमरावती व नांदेड येथे पहायला मिळाले. सत्ता गेल्यानंतर पिसाळलेल्या प्रमाणे राज्यातील काही लोक चिथावणीखोर पणे वागत आहेत. आज पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढल्या ह्याचा परिणाम गरीब लोकांच्या छोट्या छोट्या गरजा भागविण्यासाठी अडचणीचे ठरते, गरीबांना याची झळ सोसावी लागते. या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या लोकांना राज्यात प्रतिनिधित्व करता यावे अशी आमची पण इच्छा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुका मध्ये महिलांना ५० टक्के जागा देण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. त्यामुळे महिलांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्या.

यावेळी बोलतांना प्रफुल पटेल म्हणाले की, पक्षाचा विस्तार करायचा असेल तर स्वतःच्या बळावर पक्षाला उभारी द्यावी लागेल. जुन्या काही लोकांनी पक्षाचा स्वतः साठी वापर करुन घेतला आताचे नेते पक्षाचा स्वत: साठी वापर करुन घेणारे नाहीत त्यामुळे या जिल्ह्यात पक्ष नव्याने भरारी घेईल. चंद्रपुर जिल्ह्यासाठी च्या विकासासाठी पवार साहेबांनी नेहमी साथ दिली, या भागातील शेतकरी धानाची फसल घेणारा आहे. आमच्या सरकारने सलग दोन वर्षे धानाला बोनस देण्याचा वचन नाम्या नुसार बोसन देण्यात आला.

शेतकर्‍यांना वाऱ्यावर सोडणार काही ना काही मदत देण्याचे श्री शरद पवार साहेबांनी आश्वासन दिले आहे. येणाऱ्या काळात विदर्भात व महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष निर्माण करण्यासाठी कटिबद्ध पद्धतीने आपण सर्व मिळुन प्रयत्न करु
यावेळी कार्यक्रमात खा. शरदचंद्र पवार, खा. प्रफुल पटेल, मा. ना.  प्राजक्त तनपुरे यांचा सोबत सर्वश्री माजी आमदार  राजेंद्र जैन,  रमेश बंग, माजी खा.  मधुकर कुकडे,  सुबोध मोहिते पाटील, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, डॉ. अशोक जीवतोडे,  बाबासाहेब वासाडे, श्रीमती शोभाताई पोटदुखे,  राजेंद्र वैद्य, सौ. बेबीताई उईके, प्रकाश गजभिये, नितीन भटाकर, महादेवराव पिदूरकर,

सौ. प्रज्ञा पाटील, सुजित उपरे, हिराचंद बोरकुटे, प्रियदर्शन इंगळे, मेहमूद मुशा, जगदीश जुनघरी, प्रदीप ढाले, उल्हास करपे, पंकज पवार, अशोक पोफळे, श्याम मोहरकर, पंकज जकताप, सतीश मिनगुलवार, डॉ. बाळकृष्ण भगत, चंद्रकांत अग्रवाल, फैयाज शेख, राजेंद्र ताजने, बंडूभाऊ डाखरे, नितीन पिंपळशेंडे, निसार शेख, दिनेश एकवनकर, डॉ. देव कन्नाके, अरुणभाऊ निमजे, मनोज पिल्लारे, सुमित समर्थ, डॉ. रघुनाथ बोरकर, विलास नेरकर, सुनील काळे व समस्त तालुका, शहर , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


 

Leave a Comment