विजय शिवणकर आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार !


गोंदिया दिनांक 16 नोव्हेंबर 2021 – जिल्ह्याच्या राजकारणात खळबळजनक वृत्त समोर येत आहेत आणि त्याला सुरवात देखील झाली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या मुळे सध्या राजकीय वातावरण तापल्या सारखे झाले आहे. राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे पुत्र आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला नुकताच रामराम ठोकला आहे. विजय शिवणकर हे प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात.

जिल्हा परिषद निवडणूक समोर असतांना विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काहीच आलबेल नाही हे सिद्ध झाले असून त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षाशी नाराज असल्याचे म्हटले आहे, त्यातच गेली 6 महिन्या पासून ही लगबग सुरू असल्याचे बोलले जाते.

विजय शिवणकर यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस साठी मोठा धक्का मनाला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिवणकर हे आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विजय शिवणकर हे नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपल्या मनगटावरील राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र जिल्हा वासीयांना आता तो क्षण चित्र पाहण्याची वाट आहे.


 

Leave a Comment