सौंडद येथील लोहिया विद्यालयात भव्य विधी सेवा महाशिबिर कार्यक्रम संपन्न.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 15 – सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, सौंदड येथे दि. १४/११/२०२१ रोज रविवार ला सकाळी ११ : ०० वाजता तालुका सत्र न्यायालय सडक अर्जुनी अंतर्गत भव्य महाशिबीराचे उद्घाटन मा. न्यायमूर्ती अविनाश घरोटे, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती न्यायिक जिल्हा गोंदिया यांचे शुभ हस्ते,मा. शब्बिर अहेमद औटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया तथा अध्यक्ष. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली , श्रीमती नयना गुंडे जिल्हाधिकारी गोंदिया, मा.मोरेश्वर दुधे- सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया, मा. विक्रम आव्हाड- अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, सडक अर्जुनी, आर. के. लंजे तालुका वकील संघ सडक अर्जुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमात सर्व मा.न्यायाधीश महोदयांनी नागरिकांना कायदेविषयक बाबींची सविस्तर माहिती दिली, महाशिबीरामध्ये नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छत्राखाली घेतला जसे आधार नोंदणी व दुरुस्ती, तहसील कार्यालयामार्फत मिळणाऱ्या सर्व योजना, आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्व योजना, शेतीसाठी व घरघुती वापरासाठी विज कन्नेक्शन, कोविड 19 – लसीकरण, बिपी., शुगर, ऐचबी., डोळे तपासणी ( निशुल्क) पशु व जनावरांना लसीकरण, नविन जनधन व अन्य बँक खाते उघडणे, पंचायत समितीच्या अंतर्गत सर्व योजना, वन विभागाच्या अंतर्गत सर्व योजना, भुमी अभिलेख कार्यालयातील सर्व योजना, महीला व बालकल्याण विभागातील सर्व योजना ( बेबी कीटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोरेश्वर टी. दुधे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, मा. विक्रम अं.आव्हाड, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर , सडक अर्जुनी, मा. आर.के. लंजे, अध्यक्ष तालुका वकील संघ सडक अर्जुनी तसेच तालुका व जिल्हा विधी सेवा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदतसेच मा.जगदीश लोहिया संस्थापक – संस्थाध्यक्ष लों. शि. संस्था , सौदड यांच्या मार्गदर्शनानुसार व विद्यालयाचे प्राचार्य मा. मधुसूदन अग्रवाल यांच्या आदेशानुसार विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले आहे. कार्यक्रमाचे संचालन अनिल मेश्राम प्राचार्य जि. प. महाविद्यालय, सडक अर्जुनी यांनी केले तर आभार मा. आर. के. लंजे अध्यक्ष तालुका वकील संघ सडक अर्जुनी यांनी मानले.


 

Leave a Comment