निधी मोटर्स तर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध साहित्याची भेट


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 05 ऑक्टोबर 2021 – तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये 5 वि ते 12 असे वर्ग आहेत, अश्यात दिनांक – 04 ऑक्टोबर रोजी इयत्ता 5,6 आणि 7 अश्या तीन वर्गाची शाळा चालू झाली अश्यात गेली 2 वर्षे पासून कोरोना महामारीच्या काळात मुलांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान झाले, अश्यातच शाळेतील मुलांना नव्याने रुची निर्माण व्हावी या हेतूने निधी मोटर्स चे संचालक श्रीमती सविता मोदी, श्री संदीप मोदी यांनी शालेय उपयोगी साहित्य शाळेतील मुलांना देण्यासाठी मुख्याध्यापक श्री सुनीलजी भीमटे आणि इतर सहायक शिक्षक, समितीचे अध्यक्ष श्री गंगाधर मारवाडे यांच्या समक्ष निधी मोटर्स येथे देण्यात आले.

सौन्दड येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या संख्येत विध्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळेतील पटसंख्या उंचावल्याचे मुख्याध्यापक श्री सुनील भीमटे यांनी सांगितले, त्याच बरोबर शाळेत विद्यार्थ्यां मध्ये शिक्षना विषय रुची निर्माण असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते, शाळेत विद्यार्थी मास्क लावून बसतात तर सॅनिटायजर चा देखील वापर करीत असल्याचे चित्र पाहण्यासाठी मिळाले, मोदी परिवार ने दिलेली भेट मोलाची असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले तसेच त्यांनी चर्चेत सांगितले की संदीपजी मोदी यांच्याकडून आमच्या विद्यालयालयाला वेळोवेळी मदत मिळत असते तसेच गावातील अन्य लोकसुद्धा वेळोवेळी मदत करीत असल्याचे ते यावेळी बोलत होते, यावेळी निधी मोटर्स चे संचालक संदीप मोदी, मंगेश मोदी, सौ. सविता मोदी, माताजी शांतीदेवी मोदी व मोदी परिवार उपस्थित होते, त्याच बरोबर शिक्षक वर्ग सुद्धा यावेळी उपस्थित होता.


 

Leave a Comment