सेवा आणि समर्पण अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद – रमेश लांजेवार


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 27 सप्टेंबर 2021 – सेवा आणि समर्पण अभियानांतर्गत प्रत्येक कॉलेज महाविद्यालय शाळा तसेच कोचींग सेंटर येथे घेण्यात येणाऱ्या नमो क्विज कॉम्पिटिशन स्पर्धा द्वारे मोदी सरकारने केलेल्या विकास कामांबद्दल त्याच माध्यमातून मुलांना विविध विकास कामांचा व नवीन योजनांच्या माहिती व्हावी म्हणून कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाद्वारे तालुका तील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन 700 ते 800 मुला मुलींचे 20 मार्क ची परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा केवळ सात वर्षात झालेल्या नवीन योजना वर माहिती देणारी आहे.

या कार्यक्रमा सोबतच भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी ची नवीन तालुका व शहर कार्यकारणी गठित करण्यात आली तालुका कार्यकारणी मध्ये तालुका महामंत्री म्हणून सौरभ खोटेले, शहराध्यक्ष रोशन गव्हाणे, शहर महामंत्री ओम गहाणे तसेच इतर कार्यकर्ते विद्यार्थी आघाडीच्या विविध पदावर नियुक्त करण्यात आले.  कार्यक्रमाला उपस्थित युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, जिल्हा ओबीसी आघाडीचे सचिव राजेश कटाने, युवा मोर्चा जिल्हा सहसंयोजक सोशल मीडिया गौरेश बावनकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विलास बागळकर, भाजप तालुका महामंत्री शिशिर येळे, तालुका भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रमेश लांजेवार, शुभम पराते, सौरभ खोटेले, भास्कर खोटेले, प्राची बागडे तसेच विद्यार्थी आघाडीचे विद्यार्थी उपस्थित होते.


 

Leave a Comment