एकाच कुटुंबातील ११ जणांचा नाव उलटल्याने बुडून मृत्यू


अमरावती, वृत्तसेवा, दिनांक – १४ सप्टेंबर २०२१ –  दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांसह एकाच कुटुंबातील ११ जणांचा नाव उलटल्याने बुडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यच्या वरुड तालुक्यातील झुंज येथे ही घटना मंगळवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ‌‌

मृतांमध्ये महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे गाडेगाव सह तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत तीन मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले. उर्वरीत मृतदेह काढण्यासाठी प्रशासनाने अमरावती येथून रेस्क्यू पथक बोलावले असून शोध मोहीम सुरू आहे.

घटनेची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी बघ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी होती. घटनेची माहीती जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना देण्यात आली आहे. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, वरूडचे प्रभारी तहसीलदार घोडेस्वार घटनास्थळावर दाखल झाले होते.


 

Leave a Comment