लोहिया विद्यालयात ७५ वे स्वातंत्र्य दिन संपन्न.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 15 ऑगस्ट 2021 – लोहिया शिक्षण संस्था. द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमूनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 ला विद्यालयात 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळा म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहक व कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया-संस्थापक संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मा. आ. न. घाटबांधे संस्था उपाध्यक्ष, मा.पंकज लोहिया संस्था सदस्य, मधुसूदन अग्रवाल प्राचार्य, मनोज शिंदे मुख्याध्यापक,  गुलाबचंद चिखलोंडे प्राचार्य,  संयुक्ता जोशी हेडमिस्ट्रेस आदी प्रामुख्याने उपस्थित होते, कार्यक्रमात शासनाच्या कोवीड -19 संबधी निर्देशांचे पालन करण्यात आले.


 

Leave a Comment