बातमी लागल्या मुळे नाली उपसा चालू मात्र गाळ उचलायला मुहूर्त मिळेना?


  • सौन्दड ग्राम पंचायत चा प्रताप, इमपेक्ट न्यूज. 
  • ठेकेदारांच्या मनमर्जीने चालते कारभार?

गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 30 जून 2021 – तालुक्यातील सौन्दड ग्राम पंचायत सध्या चर्चेचा विषय बनली आहे, बातम्या लागल्यावरच प्रशासनाला जाग येते असे म्हणणे चुकीचे नाही, कारण संपूर्ण उन्हाळा गेला मात्र गावातील नाल्या उपसा करण्यासाठी ग्राम पंचायत ला मुहूर्त मिळाला नाही, मात्र बातमी लागताच आंबेडकर वॉर्डातील नाल्या उपसा करायला  सुरवात झाली.

काही ग्राम पंचायत सदश्यांना यावर विचारले असता त्यांना सविस्तरपणे माहिती देता आली नाही, मात्र आपल्या वॉर्डातील नाल्या उपसा करण्यासाठी प्रयत्न चालू आहे असे सांगितले, नाल्यातील गाढ काढण्याचे काम चालू झाले मात्र नाल्यातील काढलेली घाण मुख्य मार्गावरच टाकली आहे.

परिणामी नागरिकांना चालतान्हा अडथडा निर्माण होत आहे, सध्या गावातील मुख्य मार्गावरील लाइट नाही त्या मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मुख्य मार्गावर टाकलेली घाण, पावसाने पुन्हा नाल्यात जात आहे, त्या मुळे नाल्या उपसून सुद्धा काही अर्थ नाही असे चित्र आहे, नाल्या उपसा करण्याचे काम उन्हाळ्यात केल्यास तात्काळ वाळलेली घाण ट्रॅक्टर मध्ये टाकून बाहेर टाकता येते.

मात्र शुन्य नियोजन अभावी चुकीचे कामे केले जाते, त्या मुळे ग्राम पंचायत सौन्दड च्या चाल ढकल कारभाराला जनता त्रस्त झाली आहे, मुख्य मार्गावरील घाण  प्रशासन कधी उचलणार या कडे जनतेचे लक्ष लागले आहे. एकंदरीत जनता प्रशासचा कवतिक पाहत आहे, स्थानिक ठेकेेदाराच्या मनमर्जी ने प्रशासन चालते अशी चर्चा देखील जनतेत होत आहे.


 

 

 

Leave a Comment