आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नांला यश, ६७८ कोटी रुपये झाले जमा.


  • आदिवासी विकास महामंडळास रू. १९७ कोटी व मार्केटिंग फेडरेशन रू ४८१ कोटी असे एकूण ६७८ कोटी आजच वितरित केले आहेत.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 30 एप्रिल 2021 – आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत खरीप हंगामात एकूण १३६ लक्ष क्विटल धान खरेदी करण्यात आला असून, एकूण खरेदी किंमत रु. २५५४.४५ कोटी पैकी आतापर्यंत रू. १८७६ .४३ कोटी शेतकऱ्यांना अदा करण्यात आले असून अद्याप रू. ६७८ बाकी होते.

सदर बाकी रक्कमेचे शेतकऱ्यांना त्वरित भुगतान करणेबाबत मा. आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी मा. ना. छगन भुजबळ मंत्री अन्न व नागरी पुरवठा तसेच मा.ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांची दिनांक २७/०४/२१ रोजी मंत्रालयात भेट घेवुन मागणी लावून धरली.

त्यास यश आले असून शासनाने आदिवासी विकास महामंडळास रू. १९७ कोटी व मार्केटिंग फेडरेशन रू ४८१ कोटी असे एकूण ६७८ कोटी आजच वितरित केले आहेत. सबब येत्या तीन ते चार दिवसात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पैसे मिळतील, या शिवाय बोनसची रक्कम सुद्धा येत्या पंधरा ते वीस दिवसात मिळेल असे शासनाकडून भेटीदरम्यान आश्वासीत करण्यात आले आहे.

 


 

Leave a Comment