वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १०३ वाहनावर पोलिसांनी केली जप्तीची कारवाई !

  • तर २ लक्ष ५० हजार रुपयांचा दंड ही केला वसूल… 

गोंदिया, दी. 22 डिसेंबर : हि बातमी आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांन करिता महत्वाची याला कारण म्हणजे वाहन चालविताना तुमच्या जवळ वाहनाचे डाक्युमेंट नसतील किंवा तुमच्या जवळ वाहन चालविताना वाहन परवाना म्हणजेच लायसन्स नसेल तर या पुढे तुम्ही वाहने चालवू नका ? आम्ही असे का म्हणतो असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल म्हणूनच आम्ही तुम्हाला गोंदिया वाहतूक शाखेत उभ्या असलेल्या १०३ दुचाकी वाहने दाखवीत आहोत म्हणजे तुम्हांला कडेलच.

गोंदिया चे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर, शहर वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वात गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात घडणाऱ्या अपघातांवर आडा घालण्यासाठी, बेशिस्त वाहन चालविणाऱ्या तसेच विना परवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची तपासणीला सुरवात केली असून काल 21 डिसेंबर रोजी गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात विना परवाना वाहन चालविणाऱ्या तसेच वाहनाचे डॉक्युमेंट नसलेल्या वाहन चालकांना तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या १०३ वाहन चालकांवर कार्यवाही केली असल्याची माहिती नागेश भाषकर, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

त्यामुळे पालकांनो तुम्ही देखील सावध व्हा! आणि आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवू देऊ नका, तुमची देखील दुचाकी वाहन असेल किंवा चार चाकी वाहन वाहन असेल तर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालक करा, नाहीतर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होईल.

Leave a Comment

और पढ़ें