सडक अर्जुनी, दि. 06 मे 2023 : तालुक्यातील ग्राम कोसमघाट येथील शेतकरी अशोक म्हरस्कोल्हे यांच्या शेतात हत्तींचे करप ( दी. 05 ) रोजी फिरल्याने संपूर्ण कापणीला आलेले धान पिकाची नासाडी झाली आहे. शेतकऱ्याने सांगितले की रात्रीला 9 ते 10 वाजता दरम्यान जंगल भागातून हतींचे करप आपल्या शेतात शिरले परिणामी कापणीला आलेले धान पीक हतिंच्या पायाखाली तुडवल्या गेल्याने नष्ट झाले.
धान पेरणी पासून ते आज पर्यंत आलेला खर्च कुठून भरायचा अशी चिंता शेतकऱ्यावर आली आहे. धान पिका बरोबर पाइप लाईन आणि फळ झाडांची देखील तोड फोड केली आहे. तालुक्यातील मोगरा आणि बकी मेंढकी परिसरात देखील हतिंचे झुंड फिरत आहेत. अश्यात वन विभागाने शेतकर्यांना अलर्ट केलं आहे. मात्र झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 84