२१४७० रुपयाचे सायबर फ्रॉड अन; गोंदिया पोलिसांना रक्कम वाचविण्यात आले यश


गोंदिया, दिनांक : ३० डिसेंबर २०२२ : दिनांक २६ डिसेंबर रोजी टी. बी. टोली गोंदिया येथील रहिवाशी अर्जदार जितेंद्र उघडे यांनी फेसबुक वर फ्लिपकार्ट कंपनी चा लिंक असल्याने त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आपले डेबिट कार्ड बाबत माहिती टाकली होती.
अर्जदाराने माहिती भरताचं लगेचच अर्जदाराचे बँक ऑफ बडोदा चे अकाउंट वरून २१४७० रुपयाची कपात झाली. अर्जदारास त्यांचे डेबिट कार्ड वरून पैसे काढण्यात आल्याची व त्यांचे सोबत सायबर फ्रॉड झाल्याची बाब लक्षात येताच अर्जदाराने तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील सायबर सेल येथे संपर्क साधला.

सायबर सेल चे प्रभारी स. पो नि. महादेव सिद यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच याबाबत दखल घेत सायबर गुन्ह्यांची उकल करणारे पोलीस स्टाफ यांचे मदतीने याबाबत तात्काळ कार्यवाही करत अर्जदार यांचे डेबिट कार्डचे माध्यमाने काढण्यात आलेली रक्कम रुपये २१४७० रक्कमेची अफरातफर होण्यापासून वाचविण्यात यश आले आहे.

सदरची उत्कृष्ट कामगीरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सायबर सेल चे प्रभारी अधिकारी स.पो.नि. माधव सिद, पो. हवा. दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, मोहन शेंडे यांनी केले असुन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी गुन्ह्याची तत्परतेने दखल घेत कारवाई करून संबंधितांचे क्रेडिट कार्ड मधून पैसे काढण्यापासुन वाचवविणारे अधिकारी, अंमलदार यांचे कौतुक व अभिनंदन केले.  गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे गोंदिया जिल्ह्यातील सर्व जनतेला असे आवाहन करण्यात येते की, कोणीही मोाबाइलद्वारे कोणासही आपले ओटीपी, पासवर्ड, अथवा कोणत्याही प्रकारचे स्वतः चे बँक शी संबंधित माहिती देवू नये. काळजी घ्यावी व सायबर क्राईम ( फ्रॉड ) होण्यापासून सावध रहावे.


 

Leave a Comment