तरुणांनो स्वतःची आवड स्वतः निर्माण करा : आ. चंद्रीकापुरे


गोंदिया, दिनांक ०५ नोहेंबर २०२२ :  आपल्या देशातील उद्याचे भविष्य म्हणजे नवयुवक मंडळी पण आजकाल गैर संगतीने, गैर मार्गदर्शनाने तरुण पिढी बिघडत जात आहे.  पण आता तरुण पिढीने सुधारणा करायला हवी स्वतःचे निर्णय त्यांनी स्वतः घ्यायला पाहिजे आणि स्वतःची आवड स्वतः तयार केले पाहिजे तेव्हाच आपल्या देशाचा भविष्य समोर जाईल असे प्रतिपादन अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रीकापुरे यांनी झरपडा येथील मंडई निमित्त आयोजित मराठमोळं लावणी च्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून केले.

त्यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रभाकर दहीकर, सह उद्घाटक डॉ दिनेश बारसागडे, उपाध्यक्ष लोकपाल गहाणे, मुन्ना बोरकर, ज्ञानेश गायकवाड, सत्कारमूर्ती डॉ गजानन डोंगरवार, सुधीर मस्के उपस्थित होते. तसेच मंडई निमित्त डॉ गजानन डोंगरवार यांच्या तर्फे दंडार स्पर्धा सुद्धा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये प्रत्येक दंडारीला प्रोत्साहन पर बक्षिसे रोख रक्कम देण्यात आली.  तर त्यामधूनच उत्कृष्ट बक्षीस सुद्धा देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पवन मेश्राम, सुनील नेवारे, विक्की खरे, रामा गहाणे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे संचालन अविनाश मेश्राम व आभार मनोज वैद्य यांनी मानले.


 

Leave a Comment