- सहायक प्रशासन अधिकारी व वरिष्ठ सहायक पंचायत समिती तिरोडा चे दोन्ही लोकसेवक विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद, एक अटक एक फरार, गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
गोंदिया, दिनांक: ०९ सप्टेंबर २०२२ : तक्रारदार हे विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत असून यातील आरोपी क्र. १ प्रदिप बन्सोड, पद सहायक प्रशासन अधिकारी पंचायत समिती तिरोडा यांनी तक्रारदार यांची वैद्यकिय रजेची फाईल मंजुर करवुन देवुन वेतन काढुन देण्याकरीता आरोपी क्र. २ प्रमोद सदाशीव मेश्राम वय ४९ वर्ष पद वरिष्ठ सहायक पंचायत समिती तिरोडा यांचे करीता दहा हजार रुपये व त्यांचे स्वतः करीता सात हजार रुपये अशी एकुण रु. १७ हजार रुपयाची लाच रक्कमेची मागणी केली.
त्यावेळी तक्रारदाराने त्यांना नाईलाजाने होकार दिला. तक्रारदारस आरोपी क्र. १ प्रदिप बन्सोड, पद सहायक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, तिरोडा व आरोपी क्र. २ प्रमोद सदाशीव मेश्राम पद वरिष्ठ सहायक पंचायत समिती तिरोडा यांना लाच रक्कम रु. १७ हजार रुपये देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गै अ विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता ला.प्र.वि. गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
प्रस्तुत प्रकरणी आरोपी क्र. १ बन्सोड व आरोपी क्र. २ प्रदिप मेश्राम यांची तक्रारदाराकडे असलेल्या लाच मागणीच्या पडताळणीमध्ये दोन्ही आरोपीतांनी तक्रादराकडे पंचासमक्ष वरीलप्रमाणे लाच रकमेची मागणी करून ती लाच रकम आरोपी क्र. १ याचेकडे देण्याचे सांगुन लाच रकम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर आरोपीतांना संशय आल्याने आरोपी क्र. १ याने तक्रारदाराकडुन लाच रकम स्विकारण्यास नकार दिला. दि. ०७.०९.२०२२ रोजी आरोपी क्र. २ यास ताब्यात घेण्यात आले असुन आरोपी क्र. १ याचा शोध सुरु आहे. दोन्ही आरोपीतांविरुध्द पो.स्टे. तिरोडा जि. गोंदिया येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, श्री मधुकर गिते, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, श्री. पुरुषोत्तम अहेकर, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोनि अतुल तवाडे, स.फौ. विजय खोब्रागडे, स.फौ. चंद्रकांत करपे, पो.हवा, संजय बोहरे, मिलीकीराम पटले, ना.पो.शि. राजेंद्र बिसेन, मंगेश काहालकर, अशोक कापसे, चानापोशि दिपक बाटवें सर्व लाप्रवि, गोंदिया यांनी केली.