आजारमूक्त गावासाठी शौचालयाचा वापर करा : नरेश भांडारकर


सडक अर्जुनी, दींनाक : २६ मार्च : स्व. निर्धनराल पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय सौंदडचे रासेयो विशेष शिबिर मौजा पळसगाव/ भदुटोला येथे दि. १९ ते २५ मार्च २०२२ पर्यंत आयोजित केले असून उपमूकाअ नरेश भांडारकर यांनी शिबिराला भेट देवून स्वयंसेवक व गावकरी यांची संयुक्त भेट घेवून शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन केले यावेळी उपमूकाअ महिला व बालकल्याण एस.डी गणविर उपस्थित होते.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगांव येथे दिनांक २० मार्च २०२२ ला राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा सोहळा स्व निर्धनराव पाटील वाघाये महाविद्यालय तर्फे आयोजित करण्यात आला असून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत निर्मळ ग्राम करण्यासाठी रासयोच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी गावातील ग्राम पंचायत पदाधिकारी व तरुण यूवक-युवती बहूसंख्येने सहभागी झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित ग्रामस्वच्छता कार्यक्रमात उपमूकाअ नरेश भांडारकर यांनी तरुण यूवकांना स्वच्छतेचे दूत होण्याचे आवाहन केले व समस्त ग्रामवासियांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले 100% लोकांनी रोगराई मूक्त गांव करण्यासाठी स्वच्छालयाचा वापर करण्यासाठी प्रेरीत केले.

यावेळी अध्यक्षस्थान भारतीताई लोथे सरपंच पळसगाव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपमूकाअ एस.डी. गणविर, अतिथी म्हणून सुनील भाऊ चांदेवार उपसरपंच, भाष्कर मानकर शा.व्य.समिती अध्यक्ष, पद्वीधर शिक्षक संदिप तिडके ,भाष्कर नागपुरे पद्वीधर शिक्षक, प्रा. डॉ. योगेश करवाडे, प्रा. ताराचंद रामटेके , प्रा . हरेश मसराम , प्रा. कु. पोर्णिमा मेश्राम, शिवसंभू थोडे , प्रमोद कोटांगले, श्रीकृष्ण टेंभेकर , संजय कुमार कापगते, रमेश उपरीकर , अशोक कापसे, शत्रुघ्न गेडाम , जगदीश इरले, नागेश सोनवाने, सौ. कुंदा सावरकर, सौ. लिलाबाई लांजेवार, ग्रा.पं.सदस्य सविता मल्लेवार, पुजा कापगते व शोभा यरपूडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. रोशन भोवते, प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज पुस्तोडे तर आभार प्रा. धम्मशिल गजभिये यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.


 

Leave a Comment