सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक – 16 : ग्राम डोंगरगाव येथील पहाडी टोली वर असलेल्या मोकळ्या जागेचे तरुण मंडळी कडून क्रीडांगणात रूपांतर करण्यात आले, सदर क्रीडागंनाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असे नाव देण्यात आले, प्रसंगी क्रीडांगण नामांतर सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा ध्वज फडकवण्यात आला, त्याच बरोबर क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ( दी. 14 ला ) पार पडला, सरपंच दिनेश हुकरे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन झाले, त्याच बरोबर उपसरपंच तुकाराम राणे, ग्रामपंचायत सदस्य इंदल फुललूके, संजय डोये, तंटामुक्ती अध्यक्ष कुंडलिक लांजेवार, टेकचंद शेंडे, भानुदास डोये, अमोल कापगते व अन्य तरुण गावकरी उपस्थित होते.