गोंदिया, दींनाक – ३० जानेवारी २०२२ – जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा घोटी पंचायत समिती सडक-अर्जुनी येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक मंगेश नैनदास बोरकर यांनी महाराष्ट्र सेट परीक्षा राज्यशास्त्र या विषयात पहिल्याच प्रयत्नात पास केली असून ते सेट धारक ठरले आहेत, नोकरीच्या सुरुवातीपासूनच एक अभ्यासू , विद्यार्थीप्रिय , सामाजिक आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.
सतत स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या शालेय विद्यार्थ्यांना करून देणे यावर त्यांचा भर राहिला आहे, त्यांचे या यशाबद्दल के. वाय. सर्याम शिक्षणाधिकारी ,एस आर बागडे शिक्षण विस्तार अधिकारी , बी के चांदेकर केंद्रप्रमुख , एम टी गजभिये मुख्याध्यापक , वर्षा महालगावे , विशाखा लिचडे , गरजे मॅडम व इतर मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहेत.