चंद्रपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक


चंद्रपूर, दिनांक 20 नोव्हेंबर 2021 – राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या विदर्भाच्या दौऱ्यातील तिसऱ्या दिवशी आज जनता महाविद्यालय, सिविल लाइन, चंद्रपूर येथे चंद्रपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक खा. शरदचंद्र पवार, खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संबोधित करतांना पक्षाचा विस्तार करायचा असेल तर स्वतःच्या बळावर पक्षाला उभारी द्यावी लागेल. जुन्या काही लोकांनी पक्षाचा स्वतः साठी वापर करुन घेतला आताचे नेते पक्षाचा स्वत: साठी वापर करुन घेणारे नाहीत त्यामुळे या जिल्ह्यात पक्ष नव्याने भरारी घेईल.

चंद्रपुर जिल्ह्यासाठी च्या विकासासाठी पवार साहेबांनी नेहमी साथ दिली, या भागातील शेतकरी धानाची फसल घेणारा आहे. आमच्या सरकारने सलग दोन वर्षे धानाला बोनस देण्याचा वचन नाम्या नुसार बोसन देण्यात आला. शेतकर्‍यांना वाऱ्यावर सोडणार काही ना काही मदत देण्याचे  शरद पवार यांनी आश्वासन दिले आहे. येणाऱ्या काळात विदर्भात व महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष निर्माण करण्यासाठी कटिबद्ध पद्धतीने आपण सर्व मिळुन प्रयत्न करु.

यावेळी कार्यक्रमात खा. शरदचंद्र पवार, खा. प्रफुल पटेल, मा. ना.  प्राजक्त तनपुरे,  मोरेश्वर टेमुर्डे, यांचा सोबत सर्वश्री माजी आमदार  राजेंद्र जैन, माजी खा.  मधुकर कुकडे,  सुबोध मोहिते पाटील, आमदार मनोहर चंद्रिकापुरे,  राजेंद्र वैद्य, बेबीताई उईके,  सुनील फ़ुंडे, प्रशांत पवार, ईश्वर बाळबुधे, प्रकाश गजभिये, नितीन भटाकर, महादेवराव पिदूरकर, सौ. प्रज्ञा पाटील, सुजित उपरे, हिराचंद बोरकुटे, प्रियदर्शन इंगळे, मेहमूद मुशा, जगदीश जुनघरी, प्रदीप ढाले, उल्हास करपे, पंकज पवार, अशोक पोफळे, श्याम मोहरकर, पंकज जकताप, सतीश मिनगुलवार, डॉ. बाळकृष्ण भगत, चंद्रकांत अग्रवाल, फैयाज शेख, राजेंद्र ताजने, बंडूभाऊ डाखरे, नितीन पिंपळशेंडे, निसार शेख, दिनेश एकवनकर, डॉ. देव कन्नाके, अरुणभाऊ निमजे, मनोज पिल्लारे, सुमित समर्थ, डॉ. रघुनाथ बोरकर, विलास नेरकर, सुनील काळे व समस्त तालुका, शहर , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .


 

Leave a Comment