सौन्दड येथे घरफोडी १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास.


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक – १९ नोव्हेंबर २०२१ – दिनांक ०३ नोव्हेंबर च्या ११:०० वा ते दिनांक १८ नोव्हेंबर १०:०० वा. दरम्यान यातील फिर्यादी निलेश मोहन कोहळे वय २३ वर्ष रा. सौदड (रेल्वेटोली) हे आपल्या परीवारासह नागपुर येथे बहीनीकडे गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने सुना मौका पाहुन फिर्यादीचे मागील दरवाजाचे कडी काढून घराचे आत प्रवेश करून एक जुना लॅपटॉप एच.पी. कंपनीचा किंमती १५,००० रु व आलमारी मध्ये ठेवलेले दोन जोड चांदीच्या पयजन किंमती २,०००/रु असा एकुण १७,०००/रु वा माल चोरून नेल्याने फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे इग्गीपार येथे अप क्र. २९३/२०२९ कलम ४५४, ४५७, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास पोहचा / १०३४ चौधरी पोस्टे डुग्गीपार हे करीत आहेत.


 

Leave a Comment