नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अखेर झाली निवड!


मुंबई, दिनांक – 05 फेब्रुवारी 2021 – मागील दोन-तीन दिवसांपू्र्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी कोणाची नियुक्ती होणार याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होत. मात्रा आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांच्या जागी राज्यातील आक्रमक नेते म्हणून ओळख असलेेले काँग्रेस नेते नाना पटोले यांची निवड झाली आहे.

नाना पटोले यांनी गुरुवार 4 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 24 तासांत त्यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या नाना पटोलेंनी बुधवारी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष पद कुणाला मिळणार यावर सुद्धा चर्चा रंगली आहे, एकंदरीत काँग्रेस पक्षा कडे विधानसभा अध्यक्ष पद राहणार यावर सुद्धा राजकारणात चर्चा रंगू लागली आहे, नेमकं पुढे काय होते ते पाहणे आहे.


 

Leave a Comment