पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.


सडक/अर्जुनी, दिनांक – २६ – आज दिनांक 26 जानेवारी 2021 ला पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक संतोषजी राऊत पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड, प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापिका राजश्री बडोले मॅडम, माजी सरपंच श्री लालचंद जी खडके, प्रतिष्ठित नागरिक अशोकजी विठ्ठले साहेब व इतर गणमान्य उपस्थित होते. सर्वप्रथम संविधानाचे वाचन करण्यात आले.

स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या थोर पुरुषांचे प्रतिमेला माल्यार्पण करून पूजा-अर्चना करण्यात आली. सौ ज्योती ईरले मॅडम यांनी ध्वजारोहण केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी दर्शना डोंगरावर सौ उषा बिसेन मॅडम, सौ ज्योती नेवारे मॅडम, कुमारी दिपाली वालदे मॅडम, कुमारी लीना डोंगरवार मॅडम व ठाकरे बाई यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सौ अश्विनी लोणारे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री विजय कोचे सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.

 


 

Leave a Comment

और पढ़ें