लोहिया विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा.


 


सडक/अर्जुनी, दिनांक – 26 जानेवारी 2021 – सौन्दड येथिल रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा व लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौन्दड यांच्या सयूंक्त विद्यमाने दिनांक 26 जानेवारी 2021 ला 72 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहाने विद्यालयात साजरा करण्यात आला.



ध्वजारोहक व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख अतिथींनी पूजनीय भारत माता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महान देशभक्त सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. त्यानंतर मा.ध्वजारोहक यांनी अतिथी व गावकरी उपस्थितीत विद्यालया समोरील संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले.



कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व लगेच ध्वजारोहक मा. जगदीश लोहिया, संस्थापक- संस्थाध्यक्ष, लो.शी.संस्था यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रभूदयाल लोहिया माजी जी. प.सदस्य,मा. पंकज लोहिया संस्था सदस्य, मा.सचिन लोहिया,ग्रा.पं सदस्य, मा. शमिम अहमद सय्यद हेडमिस्ट्रेस मा.सयूंक्ता जोशी, मा.रामचंद्र भेंडारकर, राजकुमार भैसारे, भजनदास बडोले, अशोक कापगते, प्रल्हाद कोरे, ओ. बी.बिसेन, गुलाब शहारे, महादेव लाडे, राजकुमार भैसारे, दामोदर मेश्राम, नलीराम चांदेवार विद्यालयाचे प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे , मुख्याध्यापक मनोज शिंदे व पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे उपस्थित होते.

 

ध्वजारोहक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांनी ”आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत म्हणून जीवनात यशासाठी महत्तम प्रयत्न करा.” असे मोलाचे मार्गदर्शन करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल तसेच हेडमिस्ट्रेस संयुक्ता जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले व अभ्यास विषयक मार्गदर्शन केले.

 

विद्यार्थ्यांनी सुद्धा देशभक्ती गीत व भाषणातून प्रजासत्ताक दिन व भारतीय गणराज्याचे महत्व विषद केले.कार्यक्रमात देशाच्या शहिदांवर श्रद्धांजली गीत सादर करण्यात आले व दोन मिनिटांचे मौन ठेवून वीर शहिद जवान व सिरम इन्स्टिट्यूट, पुणे येथील कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

कार्यक्रमात कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्था, संस्थेच्या व शाळेच्या समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगन ,पालक,गावकरी तसेच विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.यु.बी.डोये यांनी केले तर आभार प्राचार्य गुलाबाचंद चिखलोंढे यांनी मानले. वंदेमातरम’ या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 

Leave a Comment

और पढ़ें