( फाईल फोटो )
- महसूल विभागाला मात्र रोज लागतोय लाखो रुपयांचा चुना.
- तहसीलदार अक्षय पोयाम, उपविभागीय अधिकारी वरून कुमार शाहारे यांचे आशीर्वाद !
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 22 डिसेंबर : सडक अर्जुनी तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदी पात्रातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळूचा सर्रास उपसा करून वाहतूक केली जात आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक महसूल विभागाचे सातत्याने सर्रास दुर्लक्ष होत आहे, यात तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी यांची जबाबदारी असली तरी पाहिजे तशी कारवाई केली जात नसल्याने महसूल विभाला रोज कोट्यावधी रुपयांचा चुना लागत आहे. आता कुंपणात शेत खात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
या भागातून होतो वाळू उपसा
सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बामणी, तेली घाटबोरी, वडेगाव, डोंगरगाव, शिंदिपार, रेंगेपार, पांढरी, कोहडीटोला, पीपरी, सौंदड, पळसगाव, सह अनेक नदी व नाल्यातून वाळूचा सर्रास उपसा करून वाहतूक केली जाते.
शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे.
तालुक्यातून वाहणाऱ्या नदी व नाल्यातून वाळूचा सर्रास उपसा होत असल्या मुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे. शेतात जाणारे मार्ग संपूर्ण खराब होते तर गाव मार्गांची देखील दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे. दर वर्षी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याने नदी व नाले खोल होतात त्या मुळे शेतकऱ्यांच्या जमिनी देखील पुरामुळे नदी पात्रात सामावून जातात, तालुक्यातून होत असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल विभाग कारवाई करीत नसल्याने वाळू माफियांचे बुलंद होसले झाले आहेत, ज्यांच्याकडे रक्षणाची जबाबदारी आहे, त्यांचा या प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्यामुळे महसूल विभागाला रोज लाखो रुपयाचा चुना लागत आहे.
सडक अर्जुनी तालुक्याचे तहसीलदार अक्षय पोयम साहेब आहेत तर सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे साहेब आहेत यांच्याकडून सर्रास दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप महाराष्ट्र केसरी न्युज ने केले आहे. अनेक बातम्या प्रकाशित केल्यानंतरही कारवाई केली जात नाही असे चित्र आहे, महाराष्ट्र केसरी न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार पळसगाव येथे 60 ते 70 ब्रास जप्त केलेली वाळू, बामणी येथे 10 ते 15 ब्रास जप्त केलेली वाळू आणि कणेरी/ राम. येथे 5 ते 10 ब्रास जप्त केलेली वाळू अशी अंदाजे 80 ते 90 ब्रास जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयात पोहचवली नसून ती अधिकाऱ्यांच्या संगनमताने लंपास करण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी साठून ठेवलेल्या वाळूच्या ढगांर्यावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला महाराष्ट्र केसरी न्युज चे संपादक यांनी भ्रमण ध्वनी वरून माहिती दिली होती तर वाळू जप्त ही करण्यात आली होती, जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयात कधी येणार अशी तहसीलदार यांना भेटून विचारणा केली असता त्यांनी साहित्य मिळाल्यावर जमा करू अशी ग्वाही दिली होती मात्र जप्त केलेली वाळू अनेक दिवस तिथेच पडली होती अखेर ती गायब झाली मात्र तहसील कार्यालयात आनली नाही.
आमदार साहेब लक्ष देतील का ?
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार राजकुमार बडोले या प्रकाराकडे लक्ष देतील का ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून वाहणाऱ्या नदी व नाल्यातून वाळूचा सर्रास उपसा सुरू आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो. रात्रीला अनेकांच्या झोपा होत नाही अश्या देखील नागरिकांच्या चर्चेतून तक्रारी आहेत. तर महसूल विभाग आणि पोलिस विभाग सोबतच कारवाई करणार का ? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.