केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस कमिटीच्या वतीने धिक्कार रॅली काढून नोंदविला निषेध !

  • गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा देण्याची केली मागणी, राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन.

गोंदिया, दी. 22 डिसेंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करून तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. गृहमंत्र्यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून पंतप्रधानांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धिक्कार रॅली सुध्दा काढण्यात आली. परभणी येथील घटना व केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेर्धात शहरात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गोंदिया येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने रॅलीत ‘हुकूमशाही नहीं चलेगी, अशी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली त्याचबरोबर ‘अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें