- गोंदिया चा विकास करुन दाखवू : खा. प्रफुल पटेल.
गोंदिया, दि. 09 नोव्हेंबर : आमच्या देशात गरिबी ही मोठी समस्या आहे, आम्हाला जेव्हा रोटी, कपडा व मकान जेव्हा मिळेल तेव्हा आमचे खऱ्या अर्थाने ध्येय पुर्ण होईल, आमचे स्वप्न आहे, या देशाला विकसित व समृद्ध करायचे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयास चालू आहेत. ड्राय फूड स्टॉक सेंटर तसेच गोंदिया चावल निर्यातचा हब बनविण्याचे माझे ध्येय आहे. समृद्धी महामार्ग नागपूर – गोंदिया ते गडचिरोली पर्यंत जाणार आहे. आपल्याला नविन तंत्रज्ञान व दूरदृष्टी ठेवावी लागेल. देशात आजही समस्या आहेत आणि त्या बदलू शकतात त्यासाठी तुमच्या नेतृत्व कार्यक्षम असला पाहिजे आणि ते नेतृत्व विनोद अग्रवाल यांच्यात आहे असे प्रतिपादन श्री नितिन गडकरी यांनी केले.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता शेतकऱ्यांना यावर्षी सुध्दा 25000 हजार बोनस मिळवुन देवू, माता भगिनींना येणाऱ्या काळात 1500 पासुन 2100 रुपये देवू, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, अल्पदरात कृषी पंपांना सौर ऊर्जा च्या माध्यमातून विज, आरोग्य विमा सारख्या योजना जनसामान्य लोकांच्या हितासाठी राबविली आहेत.
गोंदिया चा विकास करुन दाखवू : खा. प्रफुल पटेल.
सर्वसामान्य जनतेत राहणारा, जमिनीशी नाळ जुळलेल्या माणसाला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, समस्या माहीत असतात, गोंदिया विधानसभेचे उमेदवार विनोद अग्रवाल हे जमिनी स्थरावर काम करणारा माणूस आहे, त्यांना लोकांचे प्रश्न – समस्या माहीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या 20 नोव्हेंबरला प्रचंड बहुमताने निवडून द्या गोंदिया चा विकास करुन दाखवू असे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांनी दिले.
सभेला सर्वश्री नितीन गडकरी, प्रफुल पटेल, राजेंद्र जैन, परिणय फुके, विनोद अग्रवाल, सुनिल मेंढे, अशोक इंगळे, खोमेश रहांगडाले, प्रेम कुमार रहांगडाले, येशूलाल उपराडे, दिनेश दादरीवाल, मुकेश शिवहरे, भावना कदम, रमेश भटेरे, बाळा अंजनकर, पूजा सेठ, रचना गहाने, बालकृष्ण पटले, नानू मुदलियार, नेतराम कटरे, भाऊ गजभिये, माधुरी नासरे, सिताताई रहांगडाले, मुनेश रहांगडाले, नंदूभाऊ बिशेन, किर्ती पटले, करणं टेकाम, घनश्याम पानतावणे सहित हजारोच्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.