भंडारा, दि. 11 नोव्हेंबर : महायुती सरकारने जनतेच्या कल्याणासाठी व स्वावलंबनासाठी अनेक योजना कार्यान्वित करून राज्यातील माता-भगिनींना लाडली बहन योजना, एस.टी. बसेस मध्ये 50 टक्के सवलत, मुलींना निशुल्क उच्च शिक्षण, युवकांना युवा प्रशिक्षण योजना, महायुतीचे सरकार आल्यास निराधारांना महिन्याला 2100 रुपये शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 12000 ऐवजी 15000 रुपये देण्याचा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ व रोजगार निर्मिती यासारख्या अनेक सामाजिक परिवर्तन व उन्नतीच्या योजना आमच्या सरकारने अमलात आणण्याचा वादा केलेला आहे.
आज डॉ सचिन बावनकर यांच्या आवारात ग्राम नाकडोंगरी ता. तुमसर येथे, तुमसर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आर.पी.आय महायुती चे उमेदवार श्री राजूभाऊ कारेमोरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खा.श्री प्रफुल पटेल यांनी महायुतीच्या मित्रपक्षांची संयुक्त सभेला संबोधित करताना श्री राजूभाऊ कारेमोरे यांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
संयुक्त सभेला खा.श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री नाना भाऊ पंचबुद्धे, राजुभाऊ कारेमोरे, सुनील फुण्डे, प्रदीप पडोळे, गीता कोंडेवार, प्रियंका कटरे, रूपा सोनवाने, हरेंद्र राहंगडाले शालिक सहारे, संगीता सोनवाने, माया गोपाले, संजय जैसवाल, बिंदु उके, राजेश पालीवाल, रामरतन गौपाले, मनिकराम नांदगाये, महाप्रकाश पटले, अनिता नलगोपुलवार, गोल्डी घडले, सुमित गौपाले, प्रीति सोनवाने, सचिन बावनकर, कपिल जैन, दर्शन बचवानी, गौरव शुक्ला, राहुल जैन, सुरेश गोखले, घनेश गोखले, विलास गौपाले, किशोर गौपाले, संतोष गौपाले, इंदु गौपाले, विनायक उईके, सुहागपुरी, पर्वते, मनीराम गौपाले, विलास अग्रवाल मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.