सडक अर्जुनी, दि. 11 नोव्हेंबर : आदर्श राईस मिलचे पटांगण, डव्वा ता. सडक/अर्जुनी येथे विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ खा. प्रफुल पटेल यांनी जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी महायुतीशी गठबंधन केले असले तरी पक्षाची विचारधारा ही फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा आहे. महायुती सरकार व्दारा राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या विकास व्हावा.
ही निवडणूक आपल्या भविष्याची दिशा ठरविणारी आहे. महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या या क्षेत्राच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करु असे आश्वासन श्री प्रफुल पटेल यांनी दिले.
प्रचार सभेला सर्वश्री प्रफुल पटेलजी, राजकुमार बडोले, अविनाश काशीवार, रूपविलास कुरसुंगे, अनिल बिलिया, भुमेश्वर पटले, चेतन वडगाये, शैलेंद्र कापगते, योगेश्वरी चौधरी, छायाताई चौहाण, पुष्पमाला बडोले, राकेश जैन, रमेश बडोले, प्रशांत बलशनवार, विवेक राऊत, विलास चौहाण सहित मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.