संजय हा सभागृहात बोलणारा आमदार आहे त्याची कार्यशैली वेळली आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमगाव, दि. 11 नोव्हेंबर : आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवरी शहरात प्रचार सभा घेत संजय पुराम हा सभागृहात बोलणारा आमदार आहे. तुमच्या समस्या सभागृहात ठेवून सोडविणारा आहे. म्हूणन संजय ला तिसऱ्यांदा निवडनुक लढविण्याची संधी दिल्याने मी इथे आलो असल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज दि. 11 नोव्हेंबर रोजी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. 

संजय पुराम यांना भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये पहिल्यांदा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातुन निवडणूक लढविण्याची संधी दिली असता संजय पुराम हे निवडून आले असता त्यांनी केलेली कामे पाहता पुन्हा त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संधी दिली मात्र अल्प मताने पराभव झाला असता खचून न जाता माजी आमदार असताना देखील संजय पुराम यांनी मतदार संघात कोट्यावधी रुपयाची विकास कामे खेचून आणली तर पुराम यांनी केलेली कामे पाहता भारतीय जनता पक्षाने पुन्हा संजय पुराम यांना तिसऱ्यांदा निवडूनक लढण्याची संधी दिल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांनी आभार मानले आहे.

तर देवरी विधानसभा क्षेत्रात संजय पुराम यांची ख्याती पाहता हजरो लोकांनी तसेच लाडक्या बहिणीनी देवा भाऊ ला एकण्यासाठी गर्दी केली होती तर येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघाचा विकास करायचा असल्यास अनुभवी आमदार म्हणून निवडून देण्याचे आव्हान केले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें