भंडारा, दि. 11 नोव्हेंबर : भंडारा व गोंदिया जिल्हयाच्या विकासासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केले व भविष्यातही करू परंतु विकासाची गती द्यायची असेल तर मतदान कुणाला करायचे याचा विचार करावा लागणार आहे. आम्ही शिक्षण, रोजगार, सिंचन, आरोग्याचे प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला व पुढेही करू. सामाजीक, आर्थिक, औद्योगिक सुधारणा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या. शेतकऱ्यांचे बिल माफ केले.
किसान सन्मान निधी वाढवून १५००० करणार आहोत, मुलींना मोफत उच्च शिक्षण, दुधावर अनुदान, युवकांना कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार, सत्ता आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, राज्यातील जनतेच्या प्रगतीचे मार्ग मोकळे केले आहे. आता आपली जबाबदारी आहे, मतदान प्रगती व उन्नती करिता करणार कि खोटे आश्वासन देणाऱ्यांना करणार. हीच योग्य वेळ आहे महायुतीला साथ द्या असे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी केले.
आज दि. 11 नोव्हेंबर रोजी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा चौक ग्राम डोंगरी ता. तुमसर येथे, तुमसर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आर.पी. आय महायुती चे उमेदवार श्री राजूभाऊ कारेमोरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खा. श्री प्रफुल पटेल यांनी महायुतीच्या मित्रपक्षांची संयुक्त सभेला संबोधित करताना श्री राजूभाऊ कारेमोरे यांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
संयुक्त सभेला खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री नाना भाऊ पंचबुद्धे, राजुभाऊ कारेमोरे, प्रदिप पडोळे, देवचंद ठाकरे, लक्ष्मी सावरकर, सरीता मदनकर, नरेंद्र रहांगडाले, सुरेश रहांगडाले, नरेश ईश्वरकर, राजेश भट, अनिल चौधरी, विनोद बूराडे, तुलसी गोपाले, तोफुलाल रहांगडाले, अनिल टेकाम, लक्ष्मीकांत सलामे, दीपक चौधरी, अशोक ठाकूर, देवांगना मुंगूसमारे, वसंत तरटे, दिलेंद्र चौधरी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.